Mirzapur मधील Guddu Pandit रमले बालपणीच्या आठवणीत
मिर्झापूरमधील गुड्डू पंडितची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अली फजलचे बालपण प्रचंड खास आहे. त्याच्या या बालपणीच्या आठवणीचा केंद्रबिंदू त्याचे आजोबा आहेत.
मुंबई : मिर्झापूर (Mirzapur)वेब सिरीजमध्ये गुड्डू पंडित (Guddu Pandit) चे पात्र साकारणारा अभिनेता अली फजलची ओळख आज घराघरात झाली आहे. मिर्झापूरमधील अली फजलचा अभिनय बघून आज प्रत्येक जण त्याचा चाहता बनलेला आहे. मिर्झापूरमधील अलीच्या अभिनयामुळे त्याच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे.अली फजलचे बालपण त्याच्यासाठी प्रचंड खास आहे. त्यामुळे तो आजही बालपणीच्या आठवणीत रमतो. त्याच्या या आठवणीचे केंद्रबिंदू त्याचे आजोबा आहेत.
एका मुलाखतीत अली फजलने त्याच्या बालपणीचे किस्से सांगितले आहेत. अलीने सांगितले की, त्यांचे बालपण लखनऊमध्ये गेले. त्याने लखनऊमध्येच पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. बालपणीच्या आठवणीत रममाण झालेला अली म्हणाला की, "आजोबांसोबत माझी घट्ट मैत्री आहे, ते मला वडिलांसमान आहेत, तसेच माझ्या पहिल्या चॉकलेटची आठवण देखील आजोबांसोबतच आहे."
अलीने सांगितले की, तो त्याच्या आजोबांसोबत लॉंग डाइव्हला जायचा. तेव्हा रस्त्यावर प्राणीदेखील फिरत असायचे. अली त्याच्या आजोबांबद्दलची आपली आठवण सांगताना म्हणाला की, "माझे आजोबा हे असे व्यक्ती होते ज्यांनी माझ्या लहानपणीच मला सांगितले की, तुला आयुष्यात जे काही करायचं आहे ते कर." अलीचे आजोबा हे पहिलवाण होते आणि त्यांना पंजे खेळायला प्रचंड आवडायचं. अलीने बोलता बोलता सांगितले की, त्याच्या आजी-आजोबांमध्ये आजही छोट्या-मोठ्या चेष्टा-मस्करी होतात.























