Akshay Khanna: जुहू - मलबार हिलमध्ये कोट्यवधींची घरं, अलिबागमध्ये प्रशस्त फार्महाऊस; लक्झरी कार कलेक्शन आणि बरच काही.. अब्जाधीश आहे 'धुरंधर'फेम अक्षय खन्ना
स्टारकिड असूनही लाईमलाईटपासून दूर राहणं, दर्जेदार भूमिका निवडणं आणि शांत, क्लासी जीवन जगणं- अक्षय खन्ना आजही बॉलिवूडमधील सर्वात वेगळ्या कलाकारांपैकी एक ठरत आहे..

Akshay Khanna Property: बॉलिवूडमध्ये सध्या ‘धुरंधर’ची जोरदार चर्चा आहे आणि त्यामागचं एक मोठं कारण म्हणजे अक्षय खन्नाचा जबरदस्त कमबॅक. रणवीर सिंग आणि संजय दत्तसोबत झळकणाऱ्या या सिनेमात अक्षय खन्नाने साकारलेली रेहमान डकैत ही भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरत असतानाच, सिनेमातील FA9LA हे अरबी गाणं सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे.(Akshay Khanna)
या गाण्यात अक्षय खन्ना वाळवंटाच्या पार्श्वभूमीवर काळा चष्मा, रफ-टफ लुक आणि हटके स्टाईलमध्ये डान्स करताना दिसतोय. त्याचा हा अंदाज पाहून चाहते अक्षरशः वेडे झाले असून, इंस्टाग्राम आणि रील्सवर त्याचे हजारो व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अनेक वर्षांपासून लाईमलाईटपासून दूर असलेला अक्षय खन्ना ‘छावा’ आणि आता ‘धुरंधर’मुळे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे..
दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा असलेला अक्षय खन्ना 1997 मध्ये ‘हिमालय पुत्र’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दाखल झाला. त्यानंतर ‘बॉर्डर’मधील भूमिकेमुळे तो विशेष चर्चेत आला. नंतर त्याने ‘हमराज’, ‘दिल चाहता है’, ‘हंगामा’, ‘हलचल’, ‘दृश्यम 2’ यांसारख्या यशस्वी चित्रपटांतून वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या. विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटात औरंगजेबची भूमिका साकारत त्याने त्याच्या अभिनयाची परिपक्वता दाखवून दिली.
जुहूत 35 कोटी रुपयांचा बंगला
अभिनयाइतकीच अक्षय खन्नाची जीवनशैलीही चर्चेचा विषय ठरत आहे. मुंबईतील जुहू परिसरात समुद्रकिनाऱ्यावर त्याचा सुमारे 35 कोटी रुपये किमतीचा बंगला आहे. हलक्या रंगाच्या भिंती, मोठ्या काचा आणि अत्याधुनिक सुविधांनी सजलेलं हे घर बाहेरून साधं वाटत असलं, तरी आतून राजेशाही स्वरूपाचं आहे. या घरात त्याचं खासगी थिएटरही आहे.
अलिबागमध्ये प्रशस्त फार्महाऊस
याशिवाय दक्षिण मुंबईतील मलबार हिल परिसरातही अक्षय खन्नाची एक आलिशान मालमत्ता असून, तिची अंदाजे किंमत 60 कोटी रुपये सांगितली जाते. सी व्ह्यू असलेलं हे घर उद्योगपतींचे बंगले आणि ऐतिहासिक इमारतींनी वेढलेलं आहे. अक्षय खन्ना बहुतेक वेळ याच घरात घालवतो. अलिबागमध्ये त्याचं एक प्रशस्त फार्महाऊसही आहे, जिथे तो सुट्ट्यांमध्ये शहराच्या गोंगाटापासून दूर वेळ घालवतो. तसंच मुंबईच्या ताडदेव भागातही त्याचं एक अपार्टमेंट आहे.
क्लासी गाड्यांचं कलेक्शन
लक्झरी गाड्यांचा शौकीन असलेला अक्षय खन्ना मर्सिडीज-बेंझ एस-क्लास, बीएमडब्ल्यू 5 सिरीज आणि टोयोटा फॉर्च्युनर यांसारख्या गाड्यांचा ताफा त्याच्याकडे आहे. मात्र इतर बॉलिवूड कलाकारांप्रमाणे झगमगाटी जीवनशैलीपासून तो दूरच राहतो.
एका वृत्तानुसार, अक्षय खन्ना आपली गुंतवणूक अतिशय विचारपूर्वक करतो. रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याबरोबरच कमी जोखमीच्या पर्यायांनाही तो प्राधान्य देतो. सध्या अक्षय खन्नाची एकूण संपत्ती सुमारे 167 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. स्टारकिड असूनही लाईमलाईटपासून दूर राहणं, दर्जेदार भूमिका निवडणं आणि शांत, क्लासी जीवन जगणं- अक्षय खन्ना आजही बॉलिवूडमधील सर्वात वेगळ्या कलाकारांपैकी एक ठरतोय .























