एक्स्प्लोर
अक्षय कुमार राणादाच्या भेटीला
मुंबई: कोल्हापूरच्या लाल मातीतील राणा आणि अंजलीची प्रेमकथा सध्या प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहे.
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारलाही या प्रेमकथेने भुरळ पाडली आहे. त्यामुळेच आपला आगामी सिनेमा 'जॉली एलएलबी टू'च्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार झी मराठीच्या 'तुझ्यात जीव रंगला'च्या सेटवर जाणार आहे.
मराठीमध्ये सिनेमांच्या प्रमोशनसाठी सध्या 'चला हवा येऊ द्या' या मालिकेला पसंती दिली जाते. मात्र अक्षयने वेगळा मार्ग निवडत 'तुझ्यात जीव रंगला' या प्रेमकथेत हजेरी लावण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी अक्षय कुमारने रुस्तम या सिनेमाच्या प्रमोशनसाठी 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर हजेरी लावली होती. मात्र आता अक्षय कुमारने थेट 'राणा'दाची भेट घेण्याचा चंग बांधला आहे.
राणा हा तालमीतला मल्ला. स्त्रीयांपासून नेहमी लांब पळणाऱ्या राणादाला आता अक्षय कुमार प्रेमाचे धडे देणार आहे.
जॉली एलएलबी टू
अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला जॉली एलएलबी टू हा सिनेमा सुभाष कपूर यांनी दिग्दर्शित केला आहे. यापूर्वी आलेल्या अर्शद वारसीच्या जॉली एलएलबी या सिनेमाचा हा सिक्वल आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement