Akshay Kelkar : 'बिग बॉस मराठी'चा विजेता अक्षय केळकरला लागलं म्हाडाचं घर; म्हणाला,"चमचमणारी मुंबई आता घरबसल्या पाहणार"
Akshay Kelkar New House : 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा विजेता (Bigg Boss Marathi Winner) अक्षय केळकरचं अखेर मुंबईत स्वत:चं घर झालं आहे.

Akshay Kelkar : मुंबईसारख्या शहरात स्वत:चं घर होणं हे अनेकांचं स्वप्न असतं. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटी मंडळींपर्यंत सर्वच जण स्वत:चं घर होण्यासाठी खूप मेहनत घेत असतात. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा विजेता (Bigg Boss Marathi 4 Winner) अक्षय केळकरसाठी (Akshay Kelkar) हे वर्ष खूपच खास आहे. एकीकडे वर्षाच्या सुरुवातीला तो 'बिग बॉस मराठी 4'चा विजेता झाला. तर दुसरीकडे वर्षाच्या शेवटी मुंबईत त्याला म्हाडाचं घर लागलं आहे.
स्वत:चं घर झाल्याबद्दल एबीपी माझाशी बोलताना अक्षय केळकर म्हणाला,"मुंबईकर झालो आहे, याचा नक्कीच आनंद आहे. आठवर्षापूर्वी कामाने मुंबईकर झालो होतो. पण मनाने मात्र मी कायम ठाणेकरच असणार आहे. मुंबई कर्मभूमी असली तरी ठाणे हे कायम माझ्या जवळचं राहणार आहे. मुंबईत घर होणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. माझंही ते होतं. माझं पहिलं घर मुंबईत झाल्याचा नक्कीच आनंद आहे. ठाणे सुटलेलं नाही. मला घर लागलेल्या ठिकाणाचं नाव मागा ठाणे आहे".
अक्षय पुढे म्हणाला,"2023 हे वर्ष माझ्यासाठी कमाल आहे. 2023 च्या सुरुवातीला मी 'बिग बॉस'चा विजेता झालो. वर्षाच्या शेवटी मला म्हाडाचं घर लागलं. एकंदरीत 2023 ची सुरुवात आणि शेवट गोड झाली आहे. 2023 नंतरची सर्व वर्षा माझीच असतील, असं मला वाटतं. सिनेमात, मालिकेत दिसणारी चमचमणारी मुंबई आता घरबसल्या पाहता येणार आहे".
अक्षयची खास पोस्ट (Akshay Kelkar Post)
अक्षयने घर लागल्यानंतर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिलं आहे,"माझं पहिलं घर - ते ही मुंबईत... 2023 मध्ये सगळ्या सुंदर गोष्टी आयुष्यात घडल्या, त्यातली खूप सुंदर आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मुंबईत माझं स्वतःच “घर”. काही वर्षांपूर्वी जेव्हा या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली, तेव्हा माझ्या पाच मित्रांसोबत, म्हाडाच्या बिल्डिंगमध्ये रूम शेअर करून भाड्याने राहत होतो. त्याच म्हाडाच्या मुंबईच्या प्रकल्पामध्ये या वर्षी अर्ज केला होता आणि सोडतीमध्ये विजेता ठरलो".
View this post on Instagram
अक्षयने पुढे लिहिलं आहे,"स्वप्नवत आहे पण, मला हवा तसा व्ह्यू मिळाला आहे. ज्यातून मी रोज चमकणाऱ्या, धावणाऱ्या मुंबईला बघू शकतो. सगळी जमवाजमव, कागदपत्र, लोन, तयारी आणि खूप मोठी, किचकट पण हवीहवीशी प्रक्रिया. म्हाडाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मनापासून धन्यवाद! ही सगळी प्रक्रिया पार पाडताना तुमची खूप मदत मिळाली आणि तुमच्यातला सकारात्मकपणा खरोखर कौतुकास्पद आहे. तुमच्या साथीमुळे घराचा आनंद द्विगुणित झाला. तर, आज माझ्या घराची चावी हातात आली! या वर्षाची सुरुवात आणि शेवट दोन्ही “विजेता” अशी होते आहे, ही मालिका या पुढे अशीच सदैव सुरू राहू दे".
संबंधित बातम्या
Akshay Kelkar : एक वर्ष, दोन प्रवास अन् ट्रॉफी... रिक्षाचालकाचा मुलगा ते 'बिग बॉस'चा विजेता; अक्षय केळकरची 'ती' पोस्ट चर्चेत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
