एक्स्प्लोर

Maidan Movie : चार वर्षानंतर अजय देवगण 'मैदान' मारण्यास सज्ज; जाहीर केली रिलीज डेट

Maidan Movie :  भारतीय फुटबॉल संघाचा सोनेरी इतिहास सांगणारा मैदान चित्रपटाची प्रतीक्षा अता अखेर संपली आहे.

Maidan Movie :  जवळपास चार वर्षांपासून रखडलेल्या 'मैदान' (Maidaan Movie) चित्रपटाला मुहूर्त सापडला आहे. अजय देवगणची (Ajay Devgan) या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. भारतीय फुटबॉल संघाच्या (Indian Football Team) सोनेरी इतिहासावर या चित्रपटाची कथा बेतली आहे. टीम इंडियाच्या फुटबॉल संघाचे कोच आणि मॅनेजर राहिलेले सय्यद अब्दुल रहमान यांच्या जीवनपटावर या चित्रपटाची कथा बेतली आहे.

अजय देवगणने आज त्याच्या आगामी 'मैदान' चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज केले. फुटबॉलच्या इतिहासावर अमिट छाप सोडणारी एक व्यक्ती, एक संघ, एक देश आणि त्यांच्या अतूट विश्वासाच्या विलक्षण प्रवासाचे साक्षीदार व्हा अशी कॅप्शन अजय देवगणने दिली आहे. अजय देवगणने या चित्रपटाचा ट्रेलर 7 मार्च रोजी प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर केले आहे.

फुटबॉल कोचवर आधारीत आहे चित्रपट

या चित्रपटात अजय देवगण भारतीय फुटबॉलचे संस्थापक मानले जाणारे फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहमान यांच्या भूमिकेत दिसणार आहे. सय्यद अब्दुल रहमान यांनी 1950 ते 1963 पर्यंत भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक म्हणून काम केले. 'मैदान'मध्ये अजय देवगणशिवाय प्रियमणी आणि गजराज राव हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट बोनी कपूर आणि झी स्टुडिओच्या बॅनरखाली प्रदर्शित होणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

चार वर्षांपासून रखडला होता चित्रपट

वृत्तांनुसार,  मैदान चित्रपटाची घोषणा 2018 मध्ये करण्यात आली होती. 2019 मध्ये हा चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकणार अशी अपेक्षा होती. मात्र, या चित्रपटाचे प्रदर्शन लांबले.  त्यानंतर 2023 मध्ये 'मैदान' चित्रपट रिलीज करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी त्याचा टीझरही लाँच करण्यात आला होता. मात्र, काही कारणास्तव पुन्हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर आता हा चित्रपट रिलीज होणार आहे.  

कधी होणार रिलीज मैदान?

मैदान चित्रपट हा ईदच्या दिवशी अर्थात पुढील महिन्यात चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अजय देवगणच्या या चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार याकडे सिनेसृष्टीचे लक्ष लागले आहे.

पाहा व्हिडीओ : मैदान चित्रपटाचा टीझर,  Maidaan Teaser | Eid Release | Ajay Devgn | Amit Sharma | Boney K | A.R. Rahman | Fresh Lime Films

इतर संबंधित बातमी : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

नऊवारीत आई अन् घोंगडं घेतलेला बाप जेव्हा IPS लेकासोबत पहिल्यांदा विमानातून प्रवास करतात, पाहा फोटो
नऊवारीत आई अन् घोंगडं घेतलेला बाप जेव्हा IPS लेकासोबत पहिल्यांदा विमानातून प्रवास करतात, पाहा फोटो
Solapur Municipal Election: सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
Sangli News: तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'

व्हिडीओ

Solapur Congress : सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
Uddhav Thackeray on BJP :  काहीही झाले तरी भाजपला हरवणारच, 16 तारखेला जल्लोष करायचय, उद्धव ठाकरेंचा घणाघात
Sharad Pawar - Ajit Pawar : अदानींना फ्रेम देताना सहज सावरलं, पवार काका-पुतण्यामधलं प्रेम दिसलं
Ajit Pawar Welcome Adani : गौतमभाईsss वेलकम टू बारामती... अजितदादांकडून उत्साहाने अदानींचं स्वागत
Rohit Pawar - Ajit Pawar - Gautam Adani : रोहित पवार,अजित पवार आणि अदानींचा एकाच गाडीतून प्रवास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नऊवारीत आई अन् घोंगडं घेतलेला बाप जेव्हा IPS लेकासोबत पहिल्यांदा विमानातून प्रवास करतात, पाहा फोटो
नऊवारीत आई अन् घोंगडं घेतलेला बाप जेव्हा IPS लेकासोबत पहिल्यांदा विमानातून प्रवास करतात, पाहा फोटो
Solapur Municipal Election: सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
Sangli News: तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
Satej Patil: तर त्या नवनियुक्त नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेणार! सतेज पाटलांचा काँग्रेस उमेदवारांना थेट गर्भित इशारा
तर त्या नवनियुक्त नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेणार! सतेज पाटलांचा काँग्रेस उमेदवारांना थेट गर्भित इशारा
मोठी बातमी! सोलापुरात भाजपने कमी जागा दिल्या, शिंदेंच्या शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत युती; भाजपविरुद्ध फॉर्म्युलाही ठरला
मोठी बातमी! सोलापुरात भाजपने कमी जागा दिल्या, शिंदेंच्या शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत युती; भाजपविरुद्ध फॉर्म्युलाही ठरला
महापालिकेसाठी ठाकरेंची जोरदार तयारी, प्रचारात आघाडी घेत 'मुंबई मॉडेल'चं प्रकाशन; पुस्तकात नेमकं काय?
महापालिकेसाठी ठाकरेंची जोरदार तयारी, प्रचारात आघाडी घेत 'मुंबई मॉडेल'चं प्रकाशन; पुस्तकात नेमकं काय?
Pune Crime News: पुणे विमानतळाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची पहाटे मोठी कारवाई; 50 जणांना घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
पुणे विमानतळाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची पहाटे मोठी कारवाई; 50 जणांना घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Embed widget