एक्स्प्लोर
अजय देवगण अंबाबाई चरणी, काजोलने देवीची ओटी भरली
अजय देवगण पत्नी काजोल आणि आईसह अंबाबाईच्या दर्शनाला आला.
कोल्हापूर: बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणने आज सहकुटुंब कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं. अजय देवगण पत्नी काजोल आणि आईसह अंबाबाईच्या दर्शनाला आला. यावेळी काजोलने करवीरनिवासिनी अंबाबाईची ओटी भरली.
काजोल, अजय देवगण आणि त्याची आई हे तिघेही आज सकाळी खास विमानाने कोल्हापूरमध्ये दाखल झाले. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास दोघांनी देवीचं दर्शन घेतलं आणि देवीला अभिषेकही घातला.
या दोघांना पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. त्यामुळे पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांची एकच तारांबळ उडाली.
अजय देवगण गेल्या काही वर्षांत नियमितपणे अंबामातेच्या दर्शनाला येतो. त्याप्रमाणेच यंदाही गुढीपाडव्यानंतर काजोल आणि अजय देवगण हे दोघेही करवीरनिवासनीच्या चरणी दाखल झाले.
यापूर्वी अजय देवगन त्याच्या शिवाय सिनेमाच्या निर्मितीच्या निमित्ताने अंबाबाईच्या दर्शनाला आला होता.
संबंधित बातम्या
महालक्ष्मीच्या दर्शनाला सिंघम, अजय देवगन अंबाबाईच्या चरणी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement