एक्स्प्लोर
ऐश्वर्या राय-बच्चनचे पिता कृष्णराज राय यांचं कर्करोगाने निधन

मुंबई : प्रख्यात बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनचे वडील कृष्णराज राय यांचं निधन झालं. प्रदीर्घ आजारानंतर शनिवारी लीलावती रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर लीलावतीमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. कृष्णराज राय यांचा कर्करोग बळावल्यामुळे त्यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी वृंदा राय, मुलगा आदित्य आणि ऐश्वर्या असा परिवार आहे. शनिवारी रात्री 9 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बच्चन कुटुंबीयांसोबतच दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, संजय लीला भन्साळी, अभिनेता शाहरुख खान, कुणाल कपूर यांसह अन्य कलाकारही उपस्थित होते. कृष्णराज यांच्या निधनानंतर ऐश्वर्याचे सासरे अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करुन मृत्यूची भीषणता अधोरेखित केली. https://twitter.com/SrBachchan/status/843194028585766912
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
निवडणूक
महाराष्ट्र























