Aishwarya Rai : लग्नाआधी ऐश्वर्या रायची होती 'ही' इच्छा, पण नंतर...; बच्चन कुटुंबियांपासून दुरावल्याचं 'हे' आहे कारण?
Aishwarya Rai : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) विभक्त होणार असल्याचं म्हटलं जात आहे. लग्नाआधी ऐश्वर्या रायने एक इच्छा व्यक्त केली होती. ही इच्छा पूर्ण न होणं हेच अभिनेत्रीचं बच्चन कुटुंबियांपासून दुरावल्याचं कारण आहे.
![Aishwarya Rai : लग्नाआधी ऐश्वर्या रायची होती 'ही' इच्छा, पण नंतर...; बच्चन कुटुंबियांपासून दुरावल्याचं 'हे' आहे कारण? Aishwarya Rai Divorce Abhishek Bachchan Become Doctor Before Marriage Changed Career Changed Abhishek Bachchan Jaya Bachchan Bollywood Entertainment Latest Update Marathi News Aishwarya Rai : लग्नाआधी ऐश्वर्या रायची होती 'ही' इच्छा, पण नंतर...; बच्चन कुटुंबियांपासून दुरावल्याचं 'हे' आहे कारण?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/08/19adacf11a97ab07f7414e7d4932f5421712541387159254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aishwarya Rai : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचं कुटुंब सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. अभिनेत्रीने किंबा बच्चन कुटुंबियांतील कोणत्याही सदस्याने अद्याप याबद्दल भाष्य केलेलं नाही. पण ऐश्वर्या राय संबंधित अनेक गोष्टी अजून प्रेक्षकांना माहिती नाहीत. ऐश्वर्या राय आणि सलमान खान (Salman Khan) यांचं रिलेशन चांगलच चर्चेत आलं होतं. बॉलिवूड इंडस्ट्रीतील गॉसिपचा हा सर्वात हॉट टॉपिक होता. ऐश्वर्या राय आज बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री असली तरी तिला कधीच अभिनेत्री व्हायचं नव्हतं. ऐश्वर्या रायला नेहमीच काहीतरी वेगळं काम करण्याची इच्छा होती.
ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार, ऐश्वर्या रायला अभिनेत्री होण्यापेक्षा डॉक्टर व्हायचं होतं. कॉलेजमध्ये असतानाच तिने आपलं करिअर निवडलं होतं. माझ्या कुटुंबाचा सिनेसृष्टीसोबत काही संबंध नव्हता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पदवी मिळाल्यानंतर ऐश्वर्याच्या आई-वडिलांनादेखील आपल्या लेकीने डॉक्टर व्हावं असं वाटत होतं. पण कॉलेजच्या दिवसांत अभिनेत्रीचा रस्ता बदलला. अभिनेत्रीचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलला. कॉलेजमध्ये असताना एका प्राध्यापकांनी अभिनेत्रीची निवड फॅशन शोसाठी केली. या फॅशन शोमुळे अभिनेत्रीचं आयुष्य बदललं.
ऐश्वर्या-अभिषेकचा घटस्फोट होणार?
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन 2007 मध्ये लग्नबंधनात अडकले. त्यानंतर 2011 मध्ये त्यांनी आराध्याला जन्म दिला. अनेक दिवस त्यांचा सुखी संसार सुरू होता. पण आता ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा दुरावा होणार असल्याने चाहते नाराज आहेत.
'अशी' आहे ऐश्वर्या-अभिषेकची लव्हस्टोरी (Aishwarya Rai - Abhishek Bachchan Love Story)
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची पहिली भेट 2000 मध्ये 'ढाई अक्षर प्रेम से' या चित्रपटाच्या सेटवर झाली. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते एकमेकांचे चांगले मित्र झाले. ऐश्वर्या आणि अभिषेकने पुढे अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं. पुढे त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 'ढाई अक्षर प्रेम के'नंतर ऐश्वर्या-अभिषेकने 2003 मध्ये 'कुछ ना कहो' या चित्रपटात काम केलं. 'धूम 2'च्या शूटिंगदरम्यान त्यांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिली.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा साखरपुडा 4 जानेवारी 2007 मध्ये झाला होता. पुढे 20 एप्रिल 2007 मध्ये ते लग्नबंधनात अडकले. ऐश्वर्या आणि अभिषेक आजही बॉलिवूडचे 'पॉवर कपल' आहेत. लग्नानंतर चार-वर्षांनी ऐश्वर्या-अभिषेक आई-बाबा झाले. आता त्यांच्या लग्नाला 16 वर्षे झाली आहे. 16 वर्षांच्या सुखी संसारानंतर ऐश्वर्या-अभिषेक घटस्फोट घेणार असल्याचं म्हटलं जात आहे.
संबंधित बातम्या
Aishwarya Rai : ऐश्वर्या रायचा घटस्फोट झाला तर... बच्चन कुटुंबियांच्या सूनेची थक्क करणारी प्रॉपर्टी; नेटवर्थ ऐकूण चाहते हैराण
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)