एक्स्प्लोर

ऐश्वर्या रायसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीने टीव्हीसाठी बॉलिवूड सोडलं! एका शोमुळे बनली स्टार, करिअरच्या शिखरावर असताना इंडस्ट्रीला रामराम

Top TV Actress Quit Acting : अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीने टीव्ही मालिकेसाठी बॉलीवूड सोडलं, एका शोमुळे ती स्टार बनली, पण नंतर करिअरच्या शिखरावर असताना तिने अभिनय सोडला.

मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आहेत, ज्यांनी फिल्म इंडस्ट्रीला रामराम केला. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहे. या अभिनेत्रीने ऐश्वर्य रायसारख्या आघाडीच्या अभिनेत्रीसोबत काम केलं आहे. काही अभिनेत्रींनी टीव्ही मालिकेपासून सुरुवात करत मोठा पडदाही गाजवला. पण, एका अभिनेत्री अशी आहे, जिने टीव्ही मालिकेसाठी बॉलिवूड विश्वाला रामराम ठोकला. बॉलिवूडमध्ये नाव कमावल्यानंतर अनेक टीव्ही अभिनेत्री अनेक वेळा छोट्या पडद्याला अलविदा करतात. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एका अभिनेत्री छोट्या पडद्यावर काम करण्यासाठी बॉलिवूड सोडलं. त्यानंतर टीव्हीमध्ये लोकप्रियता मिळवली आणि आता या सगळ्यापासून दूर आहे.

या अभिनेत्रीने टीव्हीसाठी बॉलिवूड सोडलं

अनेक स्टार्स बॉलिवूडमध्ये आपली छाप पाडण्यात अपयशी ठरले, जे नंतर छोट्या पडद्याकडे वळले. यातील काही मोजकेच कलाकार छोट्या पडद्यावर स्टार बनले, पण एक अभिनेत्री अशी आहे जी बॉलिवूडमधून टीव्हीवर येताच स्टार बनली. त्यानंतर करिअरच्या शिखरावर असताना तिने अभिनयाला कायमचा निरोप दिला. ही अभिनेत्री म्हणजे दिशा वकानी आहे.  दिशाने अभिनयाची सुरुवात तिच्या वडिलांसोबत बालकलाकार म्हणून केली होती.  दिशा वकानी हिने नाटक, चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. तिचे वडील भीम वकानी हे गुजराती रंगभूमीवरील लोकप्रिय कलाकारांपैकी एक होते. त्यांनीच मुलगी दिशाची लहान वयातच रंगभूमीशी ओळख करून दिली.

ऐश्वर्या रायसोबत केलंय काम

दिशा वकानीने बालकलाकार म्हणून एन्ट्री केली. त्यानंतर गुजरात कॉलेजमधून ड्रॅमॅटिक आर्ट्समध्ये पदवी मिळवली. यानंतर 'कमल पटेल विरुद्ध धमाल पटेल', 'बा रिटायर थाई चे' आणि 'लाली लीला' यांसारख्या लोकप्रिय नाटकांमध्ये काम केलं. दिशा वकानीने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ऐश्वर्या राय बच्चनच्या 'देवदास' आणि 'जोधा अकबर' सारख्या हिट चित्रपटांमध्ये दिशा वकानीने सहाय्यक भूमिका साकारल्या. याशिवाय ती प्रियांका चोप्राच्या 'लव्ह स्टोरी 2050' मध्येही दिसली आहे.

एका शोमुळे बनली स्टार

दिशा वकानीने काही काळानंतर बॉलीवूड सोडलं. यानंतर ती 'खिचडी', 'हीरो - भक्ती ही शक्ती है' आणि 'आहट' सारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसली. यादरम्यान, तिला एक शो ऑफर झाला, ज्यामुळे ती खरी स्टार झाली. हा शो दिशाच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला. दिशा वकानीला 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेची ऑफर मिळाली. यामध्ये तिने जेठालाल यांच्या पत्नी दयाबेनची भूमिका साकारायची होती. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील दयाबेनच्या भूमिकेने दिशा वकानीला प्रसिद्ध मिळाली, तिचं नाव प्रत्येक घराघरात पोहोचलं.

करिअरच्या शिखरावर असताना इंडस्ट्रीला रामराम

11 वर्षे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चा भाग राहिल्यानंतर दिशा वकानीने अभिनयाला रामराम केला. त्यानंतर ति टीव्हीवर परतली नाही. दिशा वकानीने 24 नोव्हेंबर 2015 रोजी मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंट मयूर पडियासोबत लग्न केलं. 2017 मध्ये दिशाने एका मुलीला जन्म दिला. यानंतर त्यांनी 2022 मध्ये तिला मुलगा झाला. दिशा आता लाइमलाइटपासून दूर तिच्या वैयक्तिक आयुष्याचा आनंद घेत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Kritika Malik : “दुसरी बायको” म्हटलेलं कृतिकाला आवडत नाही, म्हणाली, "माझ्याकडे एकच पर्याय होता"

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget