Anant-Radhika Wedding : अंबानींच्या शुभ आशीर्वाद सोहळ्याला ऐश्वर्या एकटीच, पण एन्ट्रीलाच अभिनेत्री संतापली? नेमकं काय घडलं?
Anant Radhika Wedding: अनंत-राधिकाच्या आशीर्वाद सोहळ्याला बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननेही हजेरी लावली होती. मात्र यादरम्यान अभिनेत्री कोणावर तरी रागावताना दिसली. नेमकं काय घडलं सविस्तर जाणून घेऊयात.
Anant-Radhika Wedding: सध्या देशातच नाही तर जगभरात अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंटच्या (Radhika Merchant) लग्नाची चर्चा होत आहे. या लग्नावर हजारो कोटी रुपये खर्च झाल्याचा दावा विविध मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जातोय. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी देशभरातील आणि जगातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींना आमंत्रित केले होतं.
अनंत आणि राधिकाच्या लग्नाला देशभरातील आणि जगभरातून विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या लग्नाला बॉलिवूडमधील बड्या दिग्गजांनीही हजेरी लावली होती. 12 जुलै रोजी 'वर्ल्ड जिओ सेंटर'मध्ये अनंत आणि राधिकाचे लग्न झाले. ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने देखील सहभाग घेतला होता. तर 13 जुलै रोजी झालेल्या आशीर्वाद सोहळ्यातही ऐश्वर्याने हजेरी लावली होती. पण या सोहळ्यातील ऐश्वर्याच्या एन्ट्रीची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे.
ऐश्वर्याच्या एन्ट्रीची चर्चा
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या आशीर्वाद सोहळ्यात ऐश्वर्या राय बच्चनने मुलगी आराध्या बच्चनसोबत एन्ट्री केली. याआधी ऐश्वर्याने मुलगी आराध्यासोबत अनंत-राधिकाच्या लग्नालाही हजेरी लावली होती. पण ती बच्चन कुटुंबासोबत दिसली नाही. त्यामुळे तिच्या एन्ट्रीच्या विशेष चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. आशीर्वाद सोहळ्यातील एका व्हिडीओमध्ये ती कोणावर तरी रागावताना दिसत आहे. त्याचप्रमाणे ती फोटोग्राफरला बाजूला होण्यास सांगतानाही दिसली. तिने हाताने काहीसा इशारा देखील केला. यावेळी तिच्या चेहऱ्यावर रागही दिसला. त्यानंतर तिने पुढे जाऊन पुन्हा पोझ दिल्या.
एकाच सोहळ्यात कुटुंबाचे दोन फॅमिली फोटो
अंबानींच्या लग्नसोहळ्यात संपूर्ण बच्चन कुटुंब उपस्थित होतं. पण सुरुवातीला अमिताभ, जया, अभिषेक, लेक श्वेता बच्चन-नंदा, जावाई अगदी लेकीची लेकही दिसत होती. पण या फोटोमध्ये मुलाची मुलगी म्हणजे आराध्या बच्चन आणि सून ऐश्वर्या बच्चन मात्र दिसले नाहीत. त्यानंतर ऐश्वर्या आणि आराध्याने या सोहळ्यात वेगळी एन्ट्री घेतली. ज्या एन्ट्रीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान ऐश्वर्या या सोहळ्यात रेखासोबत दिसली. त्यामुळे सध्या बच्चन परिवारामध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.