Bachchan Family : मुलगा, लेक, जावई, नात पण सून कुठेय? अंबानींच्या लग्नात बच्चन परिवाराचे दोन वेगळे 'फॅमिली फोटो'
Bachchan Family : अंबनींच्या लग्नात बच्चन फॅमिली ही बरीच चर्चेत आली आहे. त्यांच्या एका फॅमिली फोटोमुळे ही सगळी चर्चा रंगली आहे.
Bachchan Family : अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या लग्नसोहळ्यासाठी बॉलीवूडमधली अनेक मंडळी ही सहकुटुंब उपस्थित होती. अनेकांनी यावेळी फॅमिली फोटो काढत सोशल मीडियावर चांगलच वातावरण निर्माण केलं. पण एका फॅमिली फोटोची मात्र सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे. अमिताभ (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bchcha) यांच्या फॅमिली फोटोमुळे पुन्हा एकदा एका वेगळ्याच चर्चांना जोर आलंय.
काही दिवसांपासून ऐश्वर्या बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा सुरु आहेत. कधी त्यांच्या सोशल मीडियावरच्या पोस्टनी या चर्चांना जोर मिळतो तर कधी पूर्णविराम. पण आता त्यांच्या एका फॅमिली फोटोमुळे पुन्हा एकदा या सगळ्या चर्चांना जोर मिळाला आहे. अंबानींच्या लग्नातली या कुटुंबाची उपस्थिती ही साऱ्यांसाठीच आश्चर्यचकीत करणारी होती.
नेमकं काय घडलं?
अंबानींच्या लग्नसोहळ्यात संपूर्ण बच्चन कुटुंब उपस्थित होतं. पण सुरुवातीला अमिताभ, जया, अभिषेक, लेक श्वेता बच्चन-नंदा, जावाई अगदी लेकीची लेकही होती. पण या फोटोमध्ये मुलाच्या मुलगी म्हणजे आराध्या बच्चन आणि सून ऐश्वर्या बच्चन मात्र दिसले नाहीत. त्यानंतर ऐश्वर्या आणि आराध्याने या सोहळ्यात वेगळी एन्ट्री घेतली. ज्या एन्ट्रीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान ऐश्वर्या या सोहळ्यात रेखासोबत दिसली. त्यामुळे सध्या बच्चन परिवारामध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
ऐश्वर्यासोबत नसल्याने चर्चांना उधाण
गेल्या अनेक महिन्यांपासून अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या येत आहेत. दोघेही घटस्फोट घेऊ शकतात, असे म्हटले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. बहुतांशी वेळा ऐश्वर्या आणि अभिषेक त्यांच्या पोस्टद्वारे या अफवा फेटाळून लावतात.
ऐश्वर्या राय ही 2007 मध्ये अभिषेक बच्चनसोबत विवाहबद्ध झाली होती. या दोघांनी 'ढाई अक्षर प्रेम के', 'रावण', 'गुरू', 'धूम-2' आदी चित्रपटात काम केले. ऐश्वर्या आणि अभिषेक यांना आराध्या नावाची मुलगी आहे. ऐश्वर्या आणि आराध्या नेहमी एकत्र दिसतात.