(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aishwarya Rai : मायक्रोसॉफ्टला 400 मिलिअन डॉलर्सना विकलं होतं स्वत:चं सॉफ्टवेअर; 'त्याच' बड्या उद्योगपतीसोबत होणार होतं ऐश्वर्याचं लग्न?
Aishwarya Rai : अभिनेत्री ऐश्वर्या राय ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरीच चर्चेत आहे. त्यातच आता एका मोठ्या उद्योगपतीसोबत ऐश्वर्याचं लग्न होणार होतं अशा चर्चा रंगल्या आहेत.
Aishwarya Rai : अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या वैयक्तिक आयुष्याची सध्या बरीच चर्चा सुरु आहे. त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा या वारंवार समोर येतायत. त्यातच अभिनेत्री निम्रत कौरसोबत अभिषेकचं अफेअर असल्याचंही म्हटलं जातंय. या सगळ्यात आता एका मोठ्या उद्योगपतीचंही नाव समोर आलं आहे. इतकच नव्हे या उद्योगपतीसोबत ऐश्वर्याचं लग्न होणार असल्याचंही म्हटलं जात होतं.
उद्योगपती सबीर भाटीया यांची कोट्यवधींची नेटवर्थ आहे. इतकच नव्हे तर त्यांनी त्यांचं हॉटमेल हे सॉफ्टवेअर जवळपास 400 मिलियन डॉलर्सना बिल गेट्स यांना विकलं होतं. सबीर यांच्यसोबतच ऐश्वर्याचं लग्न होणार होतं अशा चर्चा होत्या. पण ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबत लग्नगाठ बांधली आणि या सगळ्याच चर्चांना पूर्णविराम मिळाला.
कोण आहेत सबीर भाटीला?
सबीर भाटीया यांची आज नेटवर्थ ही 1660 कोटी रुपये आहे. सबीर भाटीया यांनी 4 जुलै 1996 मध्ये हॉटमेलची सुरुवात केली. त्यांनी ही कंपनी सुरु करताच 18 महिन्यांतच बिल गेट्स यांनी त्यांची ही कंपनी जवळपास 400 मिलियन डॉलर्सना विकत घेतली.सबीर यांनी अनेक आलिशान गोष्टींची खरेदी केली आहे.
अभिषेक-ऐश्वर्याच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांबाबत अद्याप बच्चन कुटुंब किंवा ऐश्वर्याकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण, अनेक मोठ्या कार्यक्रमांमध्ये ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंब एकमेकांपासून दूर पळताना दिसले. मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नातही ऐश्वर्या आणि अभिषेक पोहोचले होते, पण हे कपल एकत्र दिसलं नाही. यानंतर अभिषेकने सोशल मीडियावर घटस्फोटासंबंधित एक पोस्ट लाईक केली होती. यानंतर दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी जोर धरला होता.
View this post on Instagram