एक्स्प्लोर

Aishwarya Rai Navya Naveli Nanda : ऐश्वर्या रायने नणंद श्वेताचा राग काढला भाचीवर? व्हिडीओ होतोय व्हायरल

Aishwarya Rai Navya Naveli Nanda : ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंबीयांमध्ये वाद सुरू असल्याची चर्चा असताना आता एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Aishwarya Rai Navya Naveli Nanda : अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि तिचे सासर असलेल्या बच्चन कुटुंबात मतभेद सुरू असून पती अभिषेकसोबत (Abhishek Bachchan) ऐश्वर्याचे संबंध चांगले नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. ऐश्वर्याचे  तिची सासू जया आणि वहिनी श्वेता नंदासोबत (Shweta Nanda) तिचे जमत नसल्याचे म्हटले जाते. या चर्चांवर कोणतेही भाष्य बच्चन कुटुंबीयांकडून करण्यात आले नाही.  त्यामुळे बच्चन कुटुंबातील वादाबाबतच्या चर्चा आणखीच गडद होतात. 

अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यात घटस्फोटाची चर्चा सुरू झाली तेव्हा दोघे एकत्र असून आनंदी असल्याचे सांगण्यात आले. ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंबीयांमध्ये वाद सुरू असल्याची चर्चा असताना आता एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ऐश्वर्या आपली भाची नाव्या नंदाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. 

ऐश्वर्या राय ही 2007 मध्ये अभिषेक बच्चनसोबत विवाहबद्ध झाली होती. या दोघांनी ढाई अक्षर प्रेम के, रावण, गुरू, धूम-2 आदी चित्रपटात काम केले. ऐश्वर्या आणि अभिषेक यांना आराध्या नावाची मुलगी आहे. ऐश्वर्या आणि आराध्या नेहमी एकत्र दिसतात. 

ऐश्वर्याने नाव्याकडे केले दुर्लक्ष

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनुसार, हा व्हिडीओ प्रो-कबड्डी लीग सामन्याच्या दरम्यानचा आहे. या व्हिडीओत ऐश्वर्या ही एन्ट्रीसाठी बॅरिकेडिंग उघडण्याची वाट पाहत असते. त्यावेळी आराध्या आतमध्ये येते. ऐश्वर्या आणि आराध्या पुढे जातात. मात्र, त्यांच्या पाठी असलेल्या नाव्याकडे ऐश्वर्या दुर्लक्ष करते. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by 🦋✨Aishwarya(ऐश्वर्या)✨🦋 (@diehardfanofaishwaryarai_arb)

युजर्सच्या कमेंट्स... 

या व्हिडीओवर युजर्सकडून कमेंट्स आल्या आहेत. ज्या प्रकारे नाव्याला ऐश्वर्याने मैागे सोडले, यावरून तिचा खरा एॅटिट्यूड दिसून येतो. एका युजर्सने म्हटले की, आई-मुलगी पुढे गेल्या पण बिचाऱ्या भाचीला मागेच सोडले. 

ऐश्वर्या आणि श्वेतामध्ये विसंवाद?

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या आणि श्वेता जेव्हाही एखाद्या इव्हेंटमध्ये एकत्र दिसतात तेव्हा त्यांच्यामध्ये एक अंतर दिसून येते. दोघेही एकत्रित फार कमी वेळा दिसतात.नाव्याने तिच्या पॉडकास्टमध्ये सांगितले होते की तिला तिच्या शोमध्ये बच्चन कुटुंबाबाहेरील पाहुणे पाहायला आवडेल. 

इतर संबंधित बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
Swati Deval on Abortions: 'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
Prabhas Fauji: हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज
हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget