Heeramandi Actress : श्रीदेवीच्या मुलासोबत अफेअरच्या चर्चा, 14 वर्षात 15 फ्लॉप चित्रपट, आता दुसऱ्यांदा वेब सीरिजमध्ये झळकणार
Heeramandi Actress Career: रुपेरी पडद्यावर सतत येत असलेल्या अपयशानंतर आता या अभिनेत्रीची दुसरी वेब सीरिज ओटीटीवर येत आहे. तिची पहिली वेब सीरिजदेखील चांगलीच हिट ठरली होती.
Heeramandi Actress Career: बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने (Salman Khan) सिनेइंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेते-अभिनेत्रींना संधी दिली. भाग्यश्री, स्नेहा उलाल, झरीन खान पासून ते डेजी शाहपर्यंतच्या या अभिनेत्रींनी सलमानच्या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. यामध्ये एक नाव हे बॉलिवूडमध्ये भारदास्त आवाज, दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आणि राजकीय क्षेत्राशी संबंध असणाऱ्या एका दिग्गज व्यक्तीशी संबंधित आहे.
या अभिनेत्रीने सलमान खानच्या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेइंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले होते. त्यानंतर अक्षय कुमार, अजय देवगण, अर्जुन कपूर आणि शाहीद कपूर आदी अभिनेत्यांसोबत सिल्वर स्क्रिन शेअर केली होती. आता ही अभिनेत्री संजय लीला भन्साळीच्या भव्यदिव्य अशा 'हिरामंडी' या आगामी वेब सीरिजमधून झळकणार आहे.
पहिलाच चित्रपट झाला हिट
ही अभिनेत्री म्हणजे बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची कन्या सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आहे. सोनाक्षीने 2010 मध्ये 'दबंग'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सोनाक्षीचा हा पहिला चित्रपट सुपरहिट झाला. त्यानंतर तिने सोनाक्षी सिन्हासोबत 'रावडी राठोड' या चित्रपटातही काम केले आणि हा चित्रपट सुपरहिट झाला. मात्र, अक्षय कुमारसोबतचा 'जोकर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर सन ऑफ सरदार आणि दबंग 2 च्या माध्यमातून हिट चित्रपट दिले.
बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले चित्रपट
2013 ते 2022 पर्यंत सोनाक्षी सिन्हाने आतापर्यंत जेवढ्या चित्रपटात काम केले. त्यात एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करू शकला नाही. यातील तिच्या काही चित्रपटातील कामाचे कौतुक झाले होते. 'आर राजकुमार' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सरासरी कमाई करू शकला तर 2019 मध्ये 'दबंग-3'हा चित्रपट सेमी-हिट ठरला. 'डबल एक्सएल' हा सोनाक्षीचा प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट होता. सोनाक्षीचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर तिचा कोणताही चित्रपट आला नाही.
श्रीदेवीच्या मुलासोबत डेटिंगच्या चर्चा
सोनाक्षी सिन्हा आपल्या व्यावसायिक कारकिर्दीसोबत प्रेम प्रकरणाबाबतही चर्चेत होती. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीचा सावत्र मुलगा अर्जुन कपूरला ती डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. अर्जुनने सोनाक्षीसोबत 'तेवर' या चित्रपटात काम केले होते. मात्र, दोघांचे अफेअर फार वेळ चालले नसल्याचे म्हटले जाते.
View this post on Instagram
सध्या या अभिनेत्यासोबत आहे रिलेशनशीपमध्ये
सध्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही आपला सह कलाकार झहीर इकबालसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा सुरू आहे. झहीर आणि सोनाक्षीने डबल एक्सएल या चित्रपटात काम केले होते. अनेकदा हे दोघे एकत्र दिसले होते.
वेब सीरिजमध्ये छाप सोडणार?
सोनाक्षी सिन्हा ही आता संजय लीला भन्साळींच्या हिरामंडी या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. या वेब सीरिजमध्ये ती फरिदान ही व्यक्तीरेखा साकारणार आहे. या वेब सीरिजमध्ये अनेक कलाकार असल्याने सोनाक्षी आपल्या कामाची छाप सोडणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
याआधी सोनाक्षी सिन्हाने दहाड या वेब सीरिजमध्ये काम केले होते. या वेब सीरिजमधील सोनाक्षीच्या कामाचे कौतुक झाले होते. या वेबी सीरिजला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता 'हिरामंडी' या वेब सीरिजमध्ये सोनाक्षी झळकणार आहे.