AI Voice Generator: AI ची कमाल! एक गाणं पाच गायकांच्या आवाजात, व्हिडीओ व्हायरल
नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एआयचा वापर करुन एक गाणं पाच गायकांच्या आवाजात तयार करण्यात आलं आहे.
AI Voice Generator: AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (Artificial Intelligence) वापर अनेक जण सध्या करत आहेत. गेल्या वर्षी, ओपन एआयने चॅट जीपीटी लाँच करून एआयच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केली. चॅट जीपीटी हा चॅटबॉट माणसांप्रमाणेच कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देतो आणि कमी वेळात अनेक कठीण कामे करू शकतो. आता एक असे एआय टूल आले आहे, ज्यामध्ये तुम्ही कोणाचाही आवाज निर्माण करू शकतात. याला व्हॉइस बॉट्स असं म्हटलं जातं. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एआयचा वापर करुन एक गाणं पाच गायकांच्या आवाजात तयार करण्यात आलं आहे.
Djmrasingh नावाच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला जग घूमेया थारे जैसा ना कोई हे सुलतान या चित्रपटामधील गाणं ऐकू येईल. हे गाणं एआयच्या मदतीनं तयार करण्यात आलं आहे. या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं, 'अरिजित, आतिफ, अदनान, सोनू, केके एआय यांनी जग घूमेया गायले तर?' या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
जग घूमेया हे गाणे राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan) यांनी गायले आहे. पण एआय टूलच्या मदतीने या गाण्याला अरिजित, आतिफ आणि सोनू यांचा आवाज देण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
जाणून घ्या एआयबद्दल...
एआय ही जगभरात प्रसिद्ध असलेली टेक्नॉलॉजी आहे. एआयचा फुल फॉर्म आर्टिफिशियल इंटेलिजन्स असा आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सला मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा अनेक क्षेत्रात वापर केला जातो.
काही दिवसांपूर्वी एआयचा वापर करुन बॉलिवूडमधील काही प्रसिद्ध अभिनेत्रींचे फोटो एटिड करण्यात आले होते. बॉलिवूड अभिनेत्री म्हाताऱ्या झाल्यानंतर कशा दिसतील? याचा अंदाज हे फोटो पाहून लावला जाऊ शकतो. एआयचा वापर करुन तयार करण्यात आलेले फोटो अनेकवेळा नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: