एक्स्प्लोर
बिटकॉईन घोटाळ्यात आता सनी लिओनी, नेहा धुपियाची चौकशी?
अभिनेत्री सनी लिओनी, नेहा धुपिया, झरीन खान, सोनल चौहान, हुमा कुरेशी यांच्यासह अनेकांनी बीटकॉईनचं प्रमोशन केल्याचा दावा केला जात आहे.
मुंबई: बिटकॉईन घोटाळाप्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रानंतर आता अनेक सेलिब्रिटीही अडचणीत येण्याची चिन्हं आहेत. अभिनेत्री सनी लिओनी, नेहा धुपिया, झरीन खान, सोनल चौहान, हुमा कुरेशी यांच्यासह अनेकांनी बीटकॉईनचं प्रमोशन केल्याचा दावा केला जात आहे.
जवळपास 2 हजार कोटींच्या या घोटाळ्यात, ईडीने राज कुंद्रा यांना समन्स बजावलं होतं. राज कुंद्रांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी 9 तास चौकशी केली.
बिटकॉईन व्यवहारातील बेहिशेबी संपत्ती प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी राज कुंद्रा यांना प्रश्न विचारले.
बिटकॉईन म्हणजे नेमकं काय?
बिटकॉईन प्रकरणात पुणे पोलिसांनी मुख्य आरोपी अमित भारद्वाज याला अटक केली होती. त्यानंतर झालेल्या चौकशीत बॉलिवूडमधल्या अनेकांची या घोटाळ्यात नावे बाहेर आली. याच घोटाळ्यात राज कुंद्राचं नाव बाहेर आल्यानंतर, इडीनं राज कुंद्राला चौकशीसाठी मुंबईत बोलावलं होतं.
अमित भारद्वाज या मुख्य आरोपीने एक वेबसाईट सुरु करुन अनेकांना कोट्यवधींचा चुन्हा लावला आहे.
नांदेडमध्ये बिटकॉईन कंपनीचा अनेकांना कोट्यवधींचा गंडा, गुन्हा दाखल
केंद्र सरकारने बिटकॉईन व्यवहार अवैध ठरवले आहेत. शिवाय या आभासी चलन व्यवहारावर बंदी घालण्यात आली आहे.
त्यामुळेच बिटकॉईनमधील बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी ईडीने राज कुंद्रा यांची चौकशी केली.
काय आहे बिटकॉईन?
बिटकॉईन हे एक नवं डिजीटल चलन आहे. कॉम्प्युटर नेटवर्किंगवर आधारित व्यवहारांसाठी याची निर्मिती झाली.
2009 मध्ये याचा शोध सातोशी नाकामोतो नावाच्या एका जपानी इंजिनियरने लावला.
बिटकॉईन खरेदी केल्यानंतर कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर त्याचे ई वॉलेट तयार होतं.
या प्रणालीमध्ये एक व्यक्ती एकपेक्षा जास्त वॉलेट तयार करु शकतात.
याचा वापर ई-मेलप्रमाणे केला जातो. पण यात फरक केवळ इतकाच आहे की, याचा पत्ता केवळ एकदाच वापरता येतो.
याचा वापर केवळ ऑनलाईन पद्धतीनेच करता येतो. तसेच याचं नियंत्रण कोणत्याही एका अधिकृत संस्थेकडे किंवा सरकारकडे नाही.
सध्या बिटकॉईनचं मूल्य भारतीय चलनानुसार तब्बल 70 हजारापेक्षा जास्त आहे.
संबंधित बातम्या
यापुढे बिटकॉईनची ऑनलाईन खरेदी बंद, आरबीआयचे आदेश
नांदेडमध्ये बिटकॉईन कंपनीचा अनेकांना कोट्यवधींचा गंडा, गुन्हा दाखल
बिटकॉईन गुंतवणुकीतून फसवणूक, पुण्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
बिटकॉईनपासून दूर राहा, आरबीआयचा सल्ला
बिटकॉईन म्हणजे नेमकं काय?
एक कोटी गुंतवले, 114 कोटी मिळवले, बिग बी मालामाल
बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर संकट, आयकर विभागाकडून नोटिसा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
नाशिक
पुणे
Advertisement