एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

The Kashmir Files : ‘द काश्मीर फाइल्स’ बनवण्याचा उद्देश काश्मिरी पंडितांबद्दल कणव नाही तर...; काँग्रेसचा गंभीर आरोप

The Kashmir Files Latest Updates : ऐतिहासिक घटनांची मोडतोड व चित्रपट बनवणाऱ्यांचे भाजपाच्या संबंधित असणे हा योगायोग नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

The Kashmir Files Latest Updates :  काश्मिरी पंडितांबद्दलचा ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट बनवण्याचा उद्देश काश्मीरी पंडीतांबद्दल कणव नाही तर राजकीय आहे. ऐतिहासिक घटनांची मोडतोड व चित्रपट बनवणाऱ्यांचे भाजपाच्या संबंधित असणे हा योगायोग नाही. काश्मिरी पंडीतांनी काश्मीरमध्ये परत कधी जायचे? हे मोदी सरकारला विचारावे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

सचिन सावंत म्हणाले की, देशविरोधी सरकार जुन्या जखमा कोरून त्या भळभळत राहतील हे पाहत असते. द्वेषातून सत्तेसाठी मतांचे पीक मिळवण्याचा त्यांचा उद्देश असतो. देशभक्त सरकार नागरिकांमध्ये प्रेम निर्माण करते आणि जुने व्रण विसरायला लावते. एकतेने देश मजबूत होतो.  दुर्दैवाने देशात गेले आठ वर्षे देशविरोधी सरकार आहे असे सावंत म्हणाले. 

भाजपाने गेले अनेक वर्षे प्रत्येक लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात काश्मीरी पंडितांना काश्मीरमध्ये स्थापित केले जाईल हे आश्वासन दिले होते आणि ध्रुवीकरणासाठी या मुद्द्याचा उपयोग केला. ३७० कलम हटवल्यानंतर काश्मीर मध्ये काश्मीरी पंडितांचा परतण्याचा मार्ग मोकळा झाला अशी बोंब ठोकली. आता काश्मीरी पंडीत कधी परतणार? या प्रश्नाचे उत्तर मोदी सरकारकडे नाही. पण देशात द्वेष पसरवून मते मिळवण्यासाठी भाजपातर्फे अजूनही काश्मीरी पंडितांचा वापर केला जात आहे. या चित्रपटाचे प्रकाशन हा भाजपाचा राजकीय अजेंडा आहे. म्हणूनच मोदी सरकारमधील मंत्री व भाजपा नेते या चित्रपटाचा उदोउदो करत आहेत असा घणाघाती आरोप सावंत यांनी केला.

सदर चित्रपट बघून येणाऱ्या प्रेक्षकांना काही ठिकाणी भाजपा कार्यकर्ते "जय श्रीराम"च्या घोषणा देण्यास भाग पाडत आहेत. पण श्रीरामाने रावणाचा द्वेष केला नाही व कैकेयीला क्षमा केली हे पहा. श्रीरामाने दाखवलेला मार्ग क्षमाशीलतेचा आहे द्वेषाचा नव्हे!  जर आठवणच ठेवायची तर ही जरुर ठेवा की पंडितांचे काश्मीरमधून अत्याचारांमुळे जबरदस्तीने विस्थापन झाले त्यावेळी केंद्रात भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर व्ही. पी. सिंग यांचे सरकार होते. जम्मू आणि काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट होती व राज्यपाल जगमोहन होते. 

जगमोहन यांच्या वर्तनामुळेच काश्मीरी पंडितांचे विस्थापित झाले व भाजपा तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राजकीय मुद्दा मिळाला. जगमोहन यांना बक्षीस म्हणून भाजपाने त्यांना राज्यसभेचे खासदार केले. हेच जगमोहन पुढे भाजपातर्फे तीन वेळा लोकसभेवर निवडून गेले  व वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीही झाले , याची आठवण सावंत यांनी करून दिली. ज्या व्यक्तीमुळे काश्मीरी पंडितांना अत्याचार सहन करावे लागले त्याला राजकीय शिक्षा देण्याऐवजी बक्षीसी का दिली? याचे उत्तर भाजपा नेत्यांनी काश्मीरी पंडितांना द्यावे असे सावंत म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8PM 27 November 2024JOB Majha : कुठे आहे नोकरीची संधी ?Nana Patole On Eknath Shinde : दिल्लीतून दबाव आला म्हणून एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतलाDelhi Meeting On Maharashtra Cabinet:  एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पावारंची उद्या दिल्लीत बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Heeramandi 2: संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Embed widget