Adult Film Star Dies : लोकप्रिय अॅडल्ट फिल्म स्टारचं वयाच्या 24 व्या वर्षी निधन; राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर
Thania Fields Dies : लोकप्रिय अॅडल्ट फिल्म स्टार थानिया फिल्ड्सचं वयाच्या 24 व्या वर्षी निधन झालं आहे. राहत्या घरी तिचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
Adult Film Star Thania Fields Dies : लोकप्रिय अॅडल्ट फिल्म स्टार थानिया फिल्ड्सचं (Thania Fields Dies) वयाच्या 24 व्या वर्षी निधन झालं आहे. राहत्या घरी तिचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. पेरु या देशातील ती लोकप्रिय अॅडल्ट फिल्म स्टार होती. आता तिच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
थानिया फिल्ड्सने वयाच्या 24 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
अॅडल्ट फिल्म स्टार थानिया फिल्ड्स नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. पण आता मात्र तिचं वयाच्या 24 व्या वर्षी निधन झाल्याचं समोर आलं आहे. थानिया तिच्या राहत्या घरी संशयास्पद मृतावस्थेत आढळून आली आहे.
थानियाने तिच्यासोबत गैरवर्तन झाल्याचा आरोप केला आहे. या आरोपांनंतर ती चर्चेत आली. त्यानंतर लगेचच एका महिन्यात तिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या अॅडल्ट फिल्म स्टारपैकी थानिया एक आहे. थानिया ही पेरु देशातील लोकप्रिय कलाकार आहे. पेरु येथील सिनेविश्वात तिने चांगलीच ओळख मिळवली आहे. अल्पावधीत पेरु येथील इंडस्ट्रीत ओळख मिळवणाऱ्यांमध्ये थानियाचा समावेश होतो.
View this post on Instagram
थानियाच्या निधनाने चाहत्यांकडून शोक व्यक्त
थानियाचा सहकारी अलेझांड्रा स्वीट याने तिच्या निधनाची बातमी चाहत्यांना दिली आहे. त्याने म्हटले आहे की,"थानियाच्या निधनाची बातमी खरी आहे. यासंदर्भात अधिक माहिती मी देऊ शकत नाही. पण तिच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे".
मिल्की पेरु या प्रॉडक्शन कंपनीनेदेखील थानियाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं आहे,"थानियाचा मृत्यू ही धक्कादायक आणि अविश्वसनीय घटना आहे. आता तिला पुन्हा जिवंत पाहण्याची इच्छा आहे. तिने ज्यांच्यासोबत काम केलं त्या प्रत्येकावर तिने प्रभाव पाडला आहे".
थानियाने काही दिवसांपूर्वीच पॉर्न इंडस्ट्रीतील अनुभवाबद्दल सांगितले होते. लैंगिक छळ आणि अत्याचार सहन करावा लागला असल्याचं तिने सांगितलं होतं. या इंडस्ट्रीत मला आलेला अनुभव खूपच विचित्र आणि हृदयावर घाव घालणारा आहे. थानियाआधी लिंडा लव्हलेसानेदेखील या इंडस्ट्रीबद्दल भाष्य केलं होतं.
संबंधित बातम्या