एक्स्प्लोर

मलंग : नेत्रसुखद पण चित्तवेधक नाही

मोहित सूरी दिग्दर्शित 'मलंग' चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. हा चित्रपट कसा आहे हे एका ओळीत सांगायचं म्हणजे नेत्रदीपक आहे.. पण चित्तवेधक नाही.

मुंबई : गोष्ट गोव्यात घडते. ख्रिसमसची आदली रात्र असते. गोव्यातून एक गुंड तुरूंगातली शिक्षा भोगून बाहेर येतो. आणि आल्या आल्या एका ज्येष्ठ पोलिसाला सांगून ठरवून एकेके पोलिसांचा खात्मा करायला लागतो. इतर सगळे पोलीस त्याच्या मागे आणि तो ठरवलेल्या प्रत्येकाचा खात्मा करू लागतो. का करतोय तो हे खून.. ही त्याने हेरलेली माणसं कोण आहेत? मारण्याआधी त्याने पोलिसांना ही बातमी का कळवली? या सगळ्याची उत्तरं क्रमाक्रमाने आपल्याला मलंगमध्ये मिळत जातात. आता ही एकदा गोष्ट ठरली की दिग्दर्शक मोहित सूरी आपल्या वकुबाप्रमाणे ही गोष्ट अधिक जलद, गुंतागुंतीची करण्याचा प्रयत्न करतो. ते करताना नेहमीचा पटकथेचा फॉरमॅट न वापरता नॉन लीनीअर म्हणजे, आज आत्ता.. आणि पूर्वी.. अशा क्रमाने त्यात दृश्य पेरत जातो. उत्तरार्धात हा लपंडाव एक होतो आणि वर्तमानात येतो. मग आपल्याला हा मुलगा गुंड कसा झाला.. तो का मारतोय वगैरे कळत जातं.. त्याचा हा सिनेमा मलंग. मुळात अशा प्रकारच्या गोष्टी नव्या नाहीत. फ्लॅशबॅकमध्ये खेळता खेळता एकदम वर्तमानात येणं आणि वर्तमानातून अचानक भूतकाळात जाणं यामुळे गुंतागुंत होण्याऐवजी कन्फ्युजन होतं. अर्थात इथे फार गोंधळ नाहीय. कारण गोष्टीचा जीव साधा आहे. आदित्य रॉय-कपूर, दिशा पटानी, अनिल कपूर, कुणाल खेमू यांच्या मुख्य भूमिका आहेत यात. मराठी कलाकारांमध्ये अमृता खानविलकर, प्रसाद जवादे ही मंडळीही आहेत. सिनेमाची श्रीमंती मोठी आहे. पूर्वार्ध खिळवून ठेवतो. त्यामुळेच उत्तरार्धाकडून अपेक्षा वाढतात. कारण अनेक प्रश्न पूर्वार्धात निर्माण होणं ही चांगलीच गोष्ट आहे. पण त्याची उत्तरं पुढे कशी मिळतात.. त्यातून काही धक्के बसतात का.. या सगळ्यावर उत्तरार्ध अवलंबून असतो. मलंग या उत्तरार्धात कमी पडतो. Baaghi 3 Trailer : टायगर श्रॉफच्या जबरदस्त अॅक्शनसह 'बागी 3' चा ट्रेलर रिलीज कलाकारांची कामं तुफान आहेत. दिशा पटानीला घेतल्याने तिच्याकडून दिसण्याच्या ज्या अपेक्षा प्रेक्षक करतो त्या सगळ्या ती पूर्ण करते. सोबत आदित्य रॉय-कपूरही देखणा आणि उमदा आहे. पूर्वार्धात काहीवेळा जिंगदी ना मिलेगी दोबाराची आठवण येते. पण काही काळापुरती. संगीत कडक जमलं आहे. मलंगची गाणी यापूर्वीच तरूणाईच्या गळ्यात बसली आहेत. बाकी सगळं उत्तम असूनही केवळ कथा उलगडत जाणारी पटकथा यांनी निराशा केल्यामुळे सिनेमा उत्तम दिसत असला तरी सिनेमा पाहूनही हूरहूर वाटत राहते. पिक्चर-बिक्चरमध्ये आपण या सिनेमाला देतो आहोत दोन स्टार्स. दिशा पटानी, आदित्य रॉय-कपूर, अनिल कपूर यांना पाहण्यासाठी सिनेमा पाहायचा असेल तर या एकदा जाऊन थिएटरमध्ये. नेत्रदीपक आहे.. पण चित्तवेधक नाही. Tanhaji Controversies | तान्हाजी चित्रपट आणि वाद, चित्रपटातील इतिहास खोटा असल्याचं सैफचं मत, तर व्यक्तिरेखांना मोदी-शाहांचे चेहरे | माझा विशेष
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget