![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ananya Panday-Aditya Roy Kapur : डोहाळजेवणाचा कार्यक्रम अनन्याच्या बहिणीचा, पण सर्वांच्या नजरा आदित्य रॉय कपूरच्या हजेरीवर, सोशल मीडियावर चर्चांना उधाण
Ananya Panday-Aditya Roy Kapur : अनन्या पांडेची बहिण अलाना पांडे हिच्या डोहाळजेवणाच्या कार्यक्रमाला अनन्या पांडेचा कथित बॉयफ्रेंड आदित्य रॉय कपूरनेही हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.
![Ananya Panday-Aditya Roy Kapur : डोहाळजेवणाचा कार्यक्रम अनन्याच्या बहिणीचा, पण सर्वांच्या नजरा आदित्य रॉय कपूरच्या हजेरीवर, सोशल मीडियावर चर्चांना उधाण Aditya Roy Kapur at Ananya Panday cousin Alanna Panday Baby Shower Ceremony Watch Video Entertainment Bollywood Latest Update Marathi News Ananya Panday-Aditya Roy Kapur : डोहाळजेवणाचा कार्यक्रम अनन्याच्या बहिणीचा, पण सर्वांच्या नजरा आदित्य रॉय कपूरच्या हजेरीवर, सोशल मीडियावर चर्चांना उधाण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/22/35f03b2905af67ad72ab9d9fc32f95111711096431533720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ananya Panday-Aditya Roy Kapur at Alanna Panday Baby Shower Ceremony : अनन्या पांडेची (Ananya Panday) चुलत बहिण आणि युट्युबर अलाना पांडे (Alanna Panday) हिच्या प्रेग्नंसीची बातमी नुकतीच समोर आली होती. त्यानंतर नुकतच मुंबईत आलानाच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम पार पडला. पण या कार्यक्रमात साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं ते आदित्य रॉय कपूरच्या हजेरीनं. अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरच्या (Aditya Roy Kapur) अफेरच्या सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे आदित्यच्या हजेरीनं साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं.
बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेची (Ananya Panday) चुलत बहीण, यूट्यूबर अलाना पांडे (Alanna Panday) आणि फोटोग्राफर इव्होर मॅकक्रे यांनी नुकतच त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन प्रेग्नंसीबाबत सांगितलं. अलानाने जेव्हा अनन्याला तिच्या प्रेग्नंसीबद्दल सांगितलं तेव्हाचा अनन्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. पण सध्या आदित्यच्या हजेरीनं पुन्हा एकदा अनन्या आणि आदित्यच्या अफेरच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
अलानाच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम
मुंबईत 21 मार्च रोजी अलानाच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात सलमान खान, हेलन, बिपाशा बासू, गौरी खान यांच्यासह अनेकांनी हजेरी लावली. पण या सगळ्यात आदित्य रॉय कपूरची हजेरीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. नुकतच अलानाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करत त्यांना मुलगा होणार की मुलगी याबद्दल खुलासा केला होता.
View this post on Instagram
अलानाने सांगितलं मुलगा होणार की मुलगी!
याआधी अलानाने तिच्या बाळाचे जेंडर रिव्हिल करणार असल्याचे फोटो देखील तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते. यामध्ये ब्लू आणि पिंक बलून्स तसेच कुशन आणि टेडी बियर देखील पाहायला मिळत होते. काही दिवसांपूर्वी तिने आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला आणि तिच्या इंस्टाग्राम कॅप्शनमध्ये लिहिले, 'जेंडर रिव्हल पिकनिक. तुम्हाला काय वाटतं की मुलगा असेल की मुलगी? तिच्या या पोस्टवरही अनेकांनी कमेंट्स करत नापसंती दर्शवली होती.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)