Adipurush Ticket Price : 'आदिपुरुष'च्या तिकीटाची किंमत 2000 रुपयांपर्यंत; अनेक सिनेमागृहांत फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल्ल
Adipurush : 'आदिपुरुष' हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.
Adipurush Movie Latest Update : 'आदिपुरुष' (Adipurush) हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. आता या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्येच या सिनेमाने कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे.
'आदिपुरुष' हा सिनेमा 16 जून 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 1150 ते 2000 रुपयांमध्ये 'आदिपुरुष'चे तिकीटे विकले जात आहेत. अनेक सिनेमागृहांत 'आदिपुरुष'च्या फर्स्ट डे फर्स्ट शोचे तिकीटे दोन हजार रुपयांत विकले जात आहेत. मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि हैदराबादमध्ये 'आदिपुरुष'चे सर्वाधिक तिकीटे विकले गेले आहेत.
'या' दोन कलाकारांनी विकत घेतले 'आदिपुरुष'चे तिकीटे
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) 'आदिपुरुष'चे 10,000 तिकीटे विकत घेतले आहेत. वंचित मुलांना तो हा सिनेमा दाखवणार आहे. तसेच दाक्षिणात्य सुपरस्टार अभिषेक अग्रवाल आणि राम चरणनेदेखील 'आदिपुरुष'चे 10,000 तिकीटं विकत घेतले आहेत.
'आदिपुरुष' या सिनेमात रामाच्या भूमिकेत प्रभास, सीता मातेच्या भूमिकेत कृती सेनन, रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान, लक्ष्मणाच्या भूमिकेत सनी सिंह आणि हनुमानाच्या भूमिकेत देवदत्त नागे दिसणार आहे. 'आदिपुरुष' या बहुचर्चित सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.
View this post on Instagram
'या' सिनेमांना मागे टाकण्यासाठी 'आदिपुरुष' सज्ज!
कोरोनाकाळानंतर 'पठाण', 'द कश्मीर फाइल्स' आणि 'आरआरआर' या सिनेमांनी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस दाखवले आहेत. 'पठाण', 'केजीएफ 2' आणि 'ब्रह्मास्त्र', 'आरआरआर' या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. त्यामुळे आता 'आदिपुरुष' हा सिनेमा या सिनेमांचे रेकॉर्ड मोडणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
रामायणावर आधारित असलेला 'आदिपुरुष'!
'आदिपुरुष' या सिनेमात प्रभास (Prabhas), कृती सेनन (Kriti Sanon) , सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि देवदत्त नागे (Devdatta Nage) मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात प्रभास रामाच्या, कृती सेनन सीता मातेच्या, सैफ अली खान रावणाच्या आणि मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे रामायणावर आधारित असलेल्या या सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. ओम राऊत, कृती सेनन आणि प्रभास सध्या 'आदिपुरुष' या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. आदिपुरुष' हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या