Adarsh shinde : 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाच्या वादादरम्यान आदर्श शिंदेची भावासाठीची पोस्ट व्हायरल
Har Har Mahadev : 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाच्या वादादरम्यान आदर्श शिंदेची भावासाठीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Adarsh Shinde On Vedat Marathe Veer Daudle Saat : महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' (Vedat Marathe Veer Daudle Saat) या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. काही राजकीय पक्ष आणि संघटनांकडून या सिनेमाला विरोध होत आहे. या सिनेमात बिग बॉस फेम उत्कर्ष शिंदे (Utkarsh Shinde) सूर्याजी दांडकरांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या या भूमिकेला सर्वत्र विरोध होत असताना त्याचा भाऊ आणि लोकप्रिय गायक आदर्श शिंदेने (Adarsh Shinde) मात्र सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत भावाचं कौतुक केलं आहे.
आदर्श शिंदेने सोशल मीडियावर 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमातील उत्कर्षच्या भूमिकेचं पोस्टर शेअर केलं आहे. पोस्टर शेअर करत त्याने लिहिलं आहे,"हे पोस्टर शेअर करताना खूप आनंद होत आहे. पोस्टर आधीच आऊट झालं असलं तरी मी आज शेअर करतोय. उत्कर्ष ही भूमिका साकारण्यासाठी तू जी मेहनत घेत आहेस ते बघून खूप छान वाटत आहे. त्यासाठी तुझं विशेष कौतुक. दिवस-रात्र ट्रेनिंग सुरू आहे. त्यामुळे तुझं हे काम नक्कीच उत्तम होईल याची खात्री आहे.
आदर्शने पुढे लिहिलं आहे,"आम्हा प्रेक्षकांना सूर्याजी दांडकर तुझ्या रूपात बघायला मिळणार आहेत. ही भूमिका तू जगणार आहेस आणि या भूमिकेच्या माध्यमातून तुला जे शिकायला मिळणार आहे याचा मला भरपूर आनंद आहे. असच सुरू राहू दे. आता हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन बघण्याची उत्सुकता वाढली आहे. तुमच्या संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा".
तगडी स्टारकास्ट असलेला ‘वेडात मराठे वीर दौडले सात’!
View this post on Instagram
‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमाच्या माध्यमातून अक्षय कुमार मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. या सिनेमात सुपस्टार अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रतापरावांच्या भूमिकेत प्रवीण तरडे दिसणार आहे. तसेच हार्दिक जोशी, विशाल निकम, विराट मडके, सत्य मांजरेकर, जय दुधाणे, डॉ.उत्कर्ष शिंदे, नवाब शहा तसेच दिपाली सय्यद, शिवानी सुर्वे, गौरी इंगवले, हेमल इंगळे हे कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
संबंधित बातम्या
Pratap Sarnaik : ऐतिहासिक सिनेमांच्या मान्यतेसाठी इतिहास तज्ज्ञांची समिती स्थापन करा; 'हर हर महादेव'च्या वादानंतर आमदार प्रताप सरनाईक यांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
