एक्स्प्लोर

अभिनेत्री प्रिती झांगियानीच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

अभिनेत्री प्रिती झांगियानीचा सात वर्षांचा मुलगा जयवीरला एका शेजाऱ्याने जीवे मारण्याची धमकी दिली होती.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झांगियानीने आपल्या मुलाला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची तक्रार पोलिसात केली आहे. प्रितीचा सात वर्षांचा मुलगा जयवीरला एका शेजाऱ्याने जीवे मारण्याची धमकी दिली होती. प्रिती झांगियानीने अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, शाहरुख खान यांची मुख्य भूमिका असलेल्या 'मोहब्बते' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. प्रितीने पती परवीन डब्बाससोबत मुंबईतील खार पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आरिफ सिद्दीकी नावाच्या व्यक्तीने धमकी दिल्याचा आरोप प्रितीने केला आहे. 'माझा मुलगा जयवीर खारमधील शिवस्थान इमारतीच्या मैदानात मित्रांसोबत खेळायला गेला होता. दुसऱ्या बिल्डिंगमधील मुलंही तिथे फुटबॉल खेळत होती. त्यावेळी मुलांमध्ये कुठल्यातरी गोष्टीवरुन भांडण झालं. तेवढ्यात जयवीरच्याच वयाच्या एका मुलाने जयवीरच्या तोंडावर बुक्का मारला. त्यामुळे माझा मुलगा त्याला मूर्ख (स्टुपिड) म्हणाला.' असं प्रितीने 'एबीपी न्यूज'शी बोलताना सांगितलं. प्रिती त्यावेळी मैदानात नव्हती, मात्र इतर मुलांच्या पालकांनी मुलांमध्ये मध्यस्थी करत भांडण सोडवलं. इतर पालकांनीच ही गोष्ट प्रितीच्या कानावर घातली. अभिनेत्री प्रिती झांगियानीच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी 'जयवीरवर हात उगारणाऱ्या मुलाने ही गोष्ट आपल्या घरी जाऊन सांगितली. त्यामुळे त्याचे आजोबा मैदानावर आले आणि जयवीरला वाईट-साईट बोलले. त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली. तिथे असलेल्या महिलांशीही उद्धटपणे वागले. एका महिलेने त्यांना थांबवलं, तेव्हा मी बायकांशी बोलत नाही, अशी अरेरावीची भाषा त्यांनी वापरली.' असा दावा प्रिती झांगियानीने केला आहे. 'जयवीर रडत-रडत घरी आला. मुलांच्या भांडणांमध्ये आम्ही पडत नाही, पण संबंधित व्यक्तीने लहान मुलं आणि महिलांशी केलेलं गैरवर्तन पाहून आम्ही त्याची पोलिसात तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतला.' असंही प्रितीने सांगितलं. आरिफ सिद्दीकीने बिनशर्त आणि लेखी माफी मागितली, तर आम्ही पोलिसातील तक्रार मागे घेऊ, असं आश्वासनही प्रितीने दिलं. प्रिती झांगियानीने ना तुम जानो ना हम, आवारा पागल दिवाना, अनर्थ यासारख्या काही हिंदी चित्रपटांसोबत तमिळ-तेलुगू सिनेमात अभिनय केला आहे. प्रितीने 23 मार्च 2008 रोजी अभिनेता परवीन डब्बाससोबत विवाह केला. त्यांना सात वर्षांचा जयवीर आणि दोन वर्षांचा देव अशी दोन मुलं आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nushrratt Bharuccha Viral Video: RCB जिंकल्यानंतर नुसरत भरुचाचा सेलिब्रेशन व्हिडीओ व्हायरल, आक्षेपार्ह आवाजांमुळे सोशल मिडीयावर ट्रोलिंग, नेमकं काय घडलं?
RCB जिंकल्यानंतर नुसरत भरुचाचा सेलिब्रेशन व्हिडीओ व्हायरल, आक्षेपार्ह आवाजांमुळे सोशल मिडीयावर ट्रोलिंग, नेमकं काय घडलं?
Horror Movie Backrooms Earns 1121 Crore Kane Parsons: 20 वर्षांच्या दिग्दर्शकाचा हॉरर सिनेमा, 3 दिवसांतच कमाई 1000 कोटी पार; 'बाहुबली', 'धुरंधर' अशा दिग्गजांना गुडघे टेकायला पाडलंय भाग
20 वर्षांच्या दिग्दर्शकाचा हॉरर सिनेमा, 3 दिवसांतच कमाई 1000 कोटी पार; 'बाहुबली', 'धुरंधर' अशा दिग्गजांना गुडघे टेकायला पाडलंय भाग
Tejashri Pradhan: 'वीण दोघांतली तुटेना' फेम तेजश्रीसाठी अंकुश चौधरीची खास पोस्ट, 'ती सध्या काय करते' चा VIDEO शेअर करत म्हणाला..
'वीण दोघांतली तुटेना' फेम तेजश्रीसाठी अंकुश चौधरीची खास पोस्ट, 'ती सध्या काय करते' चा VIDEO शेअर करत म्हणाला..
Rashmika Mandanna: ना 'पुष्पा' ना 'Animal'.. रश्मिका मंदानाने 'या' सिनेमासाठी घेतले सर्वाधिक मानधन, आकडा पाहून व्हाल अवाक्
ना 'पुष्पा' ना 'Animal'.. रश्मिका मंदानाने 'या' सिनेमासाठी घेतले सर्वाधिक मानधन, आकडा पाहून व्हाल अवाक्

व्हिडीओ

Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha
Ladki Bahin Yojana Special Report:81 लाख महिला अपात्र;विरोधकांची अदिती तटकरेंच्या राजीनाम्याची मागणी
Girish Mahajan Jalgaon : राऊत, वडेट्टीवार बोल बच्चन नेते, त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime news: कोल्हापूर हादरलं! महाविद्यालयीन तरुणीवर प्रियकरासह चौघांचा अत्याचार, अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग
कोल्हापूर हादरलं! महाविद्यालयीन तरुणीसोबत प्रियकरासह चार जणांचं नको ते कृत्य, अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग
Solapur : सोलापुरात उमेदवाराचा भयंकर कारनामा; 10 पैकी 5 सूचकांच्या बोगस सह्या, विधान परिषदेचा अर्ज बाद; फौजदारी गुन्हा दाखल होणार?
सोलापुरात उमेदवाराचा भयंकर कारनामा; 10 पैकी 5 सूचकांच्या बोगस सह्या, विधान परिषदेचा अर्ज बाद; फौजदारी गुन्हा दाखल होणार?
Surat Bardoli Bus Accident : जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद
काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद
महामंडळाच्या दोन बसची गुजरातमध्ये धडक; 7 जणांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना, भयानक फोटो
महामंडळाच्या दोन बसची गुजरातमध्ये धडक; 7 जणांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना, भयानक फोटो
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात
Beed Crime : घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम
घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
Embed widget