एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
'पद्मावत'मध्ये खिलजीला पाहून आझम खान आठवले : जयाप्रदा
निवडणुकीच्या वेळी आझम खान यांनी मला खूप त्रास दिला होता. त्यामुळे खिलजीला पाहून आझम खान आठवले, असं जयाप्रदा म्हणाल्या.
!['पद्मावत'मध्ये खिलजीला पाहून आझम खान आठवले : जयाप्रदा Actress Jaya Prada says Allauddin Khilji in Padmaavat reminded her of Azam Khan 'पद्मावत'मध्ये खिलजीला पाहून आझम खान आठवले : जयाप्रदा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/11035054/Khilji-Azam-Khan-Jayaprada.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
लखनौ : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' चित्रपट पाहताना अल्लाऊद्दीन खिलजीचं पात्र पाहून मला समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांची आठवण आली, असं वक्तव्य माजी खासदार आणि प्रख्यात अभिनेत्री जयाप्रदा यांनी केलं आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील रामपूर मतदारसंघातून जयाप्रदा यांनी निवडणूक लढवली होती. 'निवडणुकीच्या वेळी आझम खान यांनी मला खूप त्रास दिला होता. त्यामुळे खिलजीला पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर आझम खानच आले', असं जयाप्रदा म्हणाल्या.
आझम खान यांनी उद्धट वर्तन आणि लबाडी केल्याचा आरोपही जयाप्रदा यांनी केला. आझम खान यांनी 2009 मध्ये आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी अश्लील फोटोंचं वाटप केल्याचा दावाही त्यांनी केला. जयाप्रदांनी आझम खान यांचा उद्धटपणा जिरवण्याची शपथ 2009 मध्ये घेतली होती. त्यानंतर दोघांमधील कटुता सर्वांसमोर आली.
पद्मावत चित्रपटात अभिनेता रणवीर सिंगने अल्लाऊद्दीन खिलजीची व्यक्तिरेखा साकारली होती. तेराव्या शतकात दिल्लीच्या तख्तावर बसलेला खिलजीची क्रूरकर्मा अशी ख्याती होती.When I was watching #Padmaavat , Khilji's character reminded me of Azam Khan ji, how he had harassed me during elections when I was contesting: Jaya Prada pic.twitter.com/NVRi59aK8A
— ANI UP (@ANINewsUP) March 10, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रीडा
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)