एक्स्प्लोर
शिल्पा शिंदेपाठोपाठ अभिनेत्री आसावरी जोशीही राजकारणात
काही दिवसांपूर्वी 'बिग बॉस'च्या दहाव्या पर्वाची विजेती ठरलेली मराठमोळी टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदेने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
![शिल्पा शिंदेपाठोपाठ अभिनेत्री आसावरी जोशीही राजकारणात Actress Asawari Joshi enters politics, to join Congress शिल्पा शिंदेपाठोपाठ अभिनेत्री आसावरी जोशीही राजकारणात](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/02/18103605/Asawari-Joshi-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
(फोटो सौजन्य : http://asawarijoshi.com/)
मुंबई : मराठमोळी अभिनेत्री आसावरी जोशी यांनी राजकारणात एन्ट्री केली आहे. अभिनेत्री शिल्पा शिंदेनंतर आता आसावरी जोशी यादेखील काँग्रेसमध्ये सामील होणार आहेत. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत आसावरी जोशी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
काही दिवसांपूर्वी 'बिग बॉस'च्या दहाव्या पर्वाची विजेती ठरलेली मराठमोळी टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदेने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता आसावरी जोशी यांनीही काँग्रेसला हात दिला आहे.
अभिनेत्री शिल्पा शिंदेची राजकारणात एन्ट्री
53 वर्षीय आसावरी जोशी यांनी अनेक मराठी-हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. एरवी मालिका आणि चित्रपटांमधून दिसणाऱ्या आसावरी जोशी यांनी आता राजकारणाच्या माध्यमातून नवी इनिंग सुरु केली आहे.
आसावरी जोशी आणि शिल्पा शिंदे या दोघी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस प्रवेश करत असल्यामुळे त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, की स्टार प्रचारक होणार, हे येत्या काळात समजेल. मात्र काँग्रेस तिच्या लोकप्रियतेचा लाभ करुन घेणार, यात शंका नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
शिक्षण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)