एक्स्प्लोर

'संजू'ची दुसरी बाजूही दाखवायला हवी : योगेश सोमण

योगेश सोमण यांनी फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करुन चित्रपटाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मुंबई : अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित 'संजू' चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक विक्रम मोडत आहे. प्रेक्षक, समीक्षक दिग्दर्शक राजकुमार हिरानी तसंच रणबीर कपूरच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. मात्र लेखक, अभिनेते योगेश सोमण यांनी 'संजू' सिनेमावर जोरदार टीका केली आहे. योगेश सोमण यांनी फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करुन चित्रपटाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. योगेश सोमण यांनी संजय दत्तचा थेट देशद्रोही, हरामखोर, व्यसनाधीन असा केला आहे. "संजू चित्रपटात एका देशद्रोह्याचं, एका अत्यंत व्यसनाधीन तरुणाचं आयुष्य ग्लोरिफाय केलं आहे. शिवाय दोन महिन्यांनी चित्रपटवाहिन्यांद्वारे 'संजू' नावाचं आक्रमण तुमच्या घरात घुसणार आहे," असं योगेश सोमण म्हणाले. या आक्रमणाला उत्तर म्हणून संजय दत्तच्या देशद्रोही कारवायांबद्दल पोलिस केसपासून पोलिस मुलाखतींपर्यंत जे जे उपलब्ध आहे, ते आपल्या मुलांप्रमाणे चित्रपटांप्रमाणे दाखवावं. आपल्या मुलांना दोन्ही बाजू कळायला हव्या, असं योगेश सोमण यांनी सांगितलं. उद्या जर तुमचा मुलगा नशा करुन घरामध्ये आला आणि आपल्याला बिलगला, तर आपण खासदार नाही, किंवा थोरली बहिणही खासदार नाही. सामान्य घरातील माणसं आहोत. घरातील किडूक मिडूक विकून आपलं पोरगं बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पण त्याआधीच संजयसारख्या व्यक्तिमत्त्वाला ग्लोरिफाय होऊ द्यायचं नाही, असं आवाहन, सोमण यांनी पालकांना केलं आहे. योगेश सोमण यांची फेसबुक पोस्ट 'संजू'ने इतिहास रचला, रविवारी 'बाहुबली 2' चाही विक्रम मोडला काय म्हणाले योगेश सोमण? दोन महिन्यांनी 'संजू' नावाचं आक्रमण तुमच्या घरात घुसणार आहे. तो चित्रपट कसा आहे, चित्रपटकर्त्यांनी कोणत्या भावनेने हा चित्रपट बनवला आहे. आम्ही फक्त रणबीर कपूरचा अभिनय बघायला जातोय, परेश रावलचा अभिनय पाहायला जातोय या सगळ्या गोष्टींची कारंजी फेसबुक आणि इतर समाज माध्यमांवर उडतच आहेत. परंतु एका देशद्रोह्याचं, एका अत्यंत व्यसनाधीन तरुणाचं आयुष्य ग्लोरीफाय केलं आहे, हे 100 टक्के आहे. हे आक्रमण आहे, तुमच्या आमच्या मुलांच्या मनावर. या आक्रमणाला उपाय एकच आहे, संजय दत्त नावाच्या हरामखोर व्यक्तिमत्त्वाबद्दल ज्या ज्या गोष्टी माहित आहे, त्याच्या देशद्रोही कारवायांबद्दल पोलिस केसपासून पोलिस मुलाखातींपर्यत जे जे नेटवर उपलब्ध आहे, ते आपल्या मुलांना चित्रपटांप्रमाणे दाखवावं. आपल्या मुलांना दोन्ही बाजू कळायला हव्या. या पोरामुळे बापाची उत्तराधार्थातील अख्खी करिअर स्टेकला लागली होती. हे पण कळायला हवं. सिनेमात ते दाखवलंय, पण कसं, मी अमूक केलंय, मी तमूक केलंय, टॅगलाईन काय तर मी देशद्रोही नाही... उद्या जर तुमचा मुलगा नशा करुन घरामध्ये आला आणि सुनील दत्तला बिलगलाय त्याप्रमाणे आपलं पोरगं आपल्या पोटाला बिलगलं, तर आपण खासदार नाही, ना त्या पोराची थोरली बहिण खासदार आहे. आपण सामान्य माणसं आहोत. घरातलं किडूक मिडूक विकून आपल्याला आपलं पोरगं बाहेर काढण्यासाठी हरप्रयत्न करावे लागतील. त्याआधीच या व्यक्तिमत्त्वाला ग्लोरिफाय होऊ द्यायचं नाही. जर हे आक्रमण थांबवायचं असेल तर सर्व पालकांना, थोरल्या भावंडांना, मित्रांना विनंती आहे की, तुम्ही उलटं आक्रमण सुरु करा. त्याच्याबद्दलच्या प्रत्येक फॅक्ट्स आपल्या पोरांना सांगितलं पाहिजे असं मला वाटतं. "काही दिवसांनी सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणावर 'भाईजान' नावाचा सिनेमा येईल. कुठल्यातरी ईदचा मुहूर्त धरुन त्याचा शुभारंभ होणार. त्याची टॅगलाईन असेल, हां मैंने ऐश्वर्या से प्यार किया, हां मेरा ब्रेकअप हुआ था, हां उसके बाद मैं दारु पिने लगा और हां शायद रात को नशे में फुटपाथ पे सोए दो-चार लोगों को कुचला भी था, लेकिन मैं खुनी नहीं हूं. प्यार करनें वाला हूं, प्यार, प्रेम."

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate: 48 तासांत सोन्याचे दर 7 हजारांनी घसरले, चांदीची किंमतही 10 हजार रुपयांनी कमी; जानेवारीपासून पुन्हा तेजी येण्याचा अंदाज, घसरणीमागची कारणंही समोर
48 तासांत सोन्याचे दर 7 हजारांनी घसरले, चांदीची किंमतही 10 हजार रुपयांनी कमी; जानेवारीपासून पुन्हा तेजी येण्याचा अंदाज, घसरणीमागची कारणंही समोर
Kurla Phoenix Mall Mumbai News: मुंबईत तरुण-तरुणीला दगड, बेल्ट, लाकडाने मारहाण; आता धक्कादायक कारण आलं समोर, प्रत्यक्षदर्शी महिलेनेही सांगितली हादरवणारी माहिती
मुंबईत तरुण-तरुणीला दगड, बेल्ट, लाकडाने मारहाण; आता धक्कादायक कारण आलं समोर, प्रत्यक्षदर्शी महिलेनेही सांगितली हादरवणारी माहिती
साताऱ्यातील पंप्ड स्टोरेज प्रकल्पाला दुहेरी दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही काम बंदचे निर्देश, वन्यप्रेमींचा विरोध वाढला
साताऱ्यातील पंप्ड स्टोरेज प्रकल्पाला दुहेरी दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही काम बंदचे निर्देश, वन्यप्रेमींचा विरोध वाढला
Rajasthan Panchayat Election Results 2026 : राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate: 48 तासांत सोन्याचे दर 7 हजारांनी घसरले, चांदीची किंमतही 10 हजार रुपयांनी कमी; जानेवारीपासून पुन्हा तेजी येण्याचा अंदाज, घसरणीमागची कारणंही समोर
48 तासांत सोन्याचे दर 7 हजारांनी घसरले, चांदीची किंमतही 10 हजार रुपयांनी कमी; जानेवारीपासून पुन्हा तेजी येण्याचा अंदाज, घसरणीमागची कारणंही समोर
Kurla Phoenix Mall Mumbai News: मुंबईत तरुण-तरुणीला दगड, बेल्ट, लाकडाने मारहाण; आता धक्कादायक कारण आलं समोर, प्रत्यक्षदर्शी महिलेनेही सांगितली हादरवणारी माहिती
मुंबईत तरुण-तरुणीला दगड, बेल्ट, लाकडाने मारहाण; आता धक्कादायक कारण आलं समोर, प्रत्यक्षदर्शी महिलेनेही सांगितली हादरवणारी माहिती
साताऱ्यातील पंप्ड स्टोरेज प्रकल्पाला दुहेरी दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही काम बंदचे निर्देश, वन्यप्रेमींचा विरोध वाढला
साताऱ्यातील पंप्ड स्टोरेज प्रकल्पाला दुहेरी दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही काम बंदचे निर्देश, वन्यप्रेमींचा विरोध वाढला
Rajasthan Panchayat Election Results 2026 : राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
मोठी बातमी : पुण्यात विद्यार्थिनी तब्बल 14 तास लिफ्टमध्ये अडकले, नामांकित कॉलेजचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर!
मोठी बातमी : पुण्यात विद्यार्थिनी तब्बल 14 तास लिफ्टमध्ये अडकले, नामांकित कॉलेजचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर!
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: तरुणाला दगड, बेल्टने मारलं, मुलीच्या डोक्यात लाकूड घातलं; कुर्ला फिनिक्स मॉलजवळ जोडप्याला मारहाण, 8 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात
तरुणाला दगड, बेल्टने मारलं, मुलीच्या डोक्यात लाकूड घातलं; कुर्ला फिनिक्स मॉलजवळ जोडप्याला मारहाण, 8 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात
FDA : नरहरी झिरवाळांचे पीए डॉ. गाडेंचं निलंबित; बेकायदेशीर धाड प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना अन् अखेर निघाले आदेश
नरहरी झिरवाळांचे पीए डॉ. गाडेंचं निलंबित; बेकायदेशीर धाड प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना अन् अखेर निघाले आदेश
Chandrashekhar Bawankule: गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; गोशाळेसंदर्भातील नोंदणी व्यवहार कृषी दरानेच होणार, व्यावसायिक दर लावण्यावर सरकारची बंदी, महसूल विभागाचा आदेश
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; गोशाळेसंदर्भातील नोंदणी व्यवहार कृषी दरानेच होणार, व्यावसायिक दर लावण्यावर सरकारची बंदी, महसूल विभागाचा आदेश
Embed widget