सैफ अली खानला डिस्चार्ज, हिरोसारखा चालत आला, पण 'ही' तीन कामं करता येणार नाहीत, डॉक्टरांचे 4 महत्त्वाचे सल्ले!
Saif Ali Khan Attack : दिग्गज अभिनेता सैफ अली खान याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तो त्याच्या राहत्या घरी पोहोचला आहे.
Saif Ali Khan Discharged : दिग्गज अभिनेता सैफ अली खानला (Saif Ali Khan) आता डिस्चार्ज मिळाला आहे. राहत्या घरात चाकुहल्ला झाल्यानंतर त्याला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या पाच दिवासंपासून त्याच्यावर उपचार चालू होते. अखेर सहाव्या दिवशी त्याच्या प्रकृतीचा अभ्यास करून डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला आहे. दरम्यान, डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला असला तो सध्यातरी तीन गोष्टींना मुकणार आहे. तसेच त्याला डॉक्टरांचा एक महत्त्वाच्या सल्ल्याचे पालन करावे लागणार आहे.
डिस्चार्ज मिळाल्यानंतर हिरोसारखा बाहेर आला
गेल्या पाच दिवसांपासून सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयतील तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार चालू होते. या रुग्णालयात त्याच्यावर वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शस्त्रक्रियेनंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यानंतर आता सहाव्या दिवशी त्याला रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर तो निळी जिन्स आणि पांढऱ्या शर्टमध्ये आला. त्याच्यावर चाकूचे एकूण सहा वार करण्यात आले होते. मात्र या जखमांना न जुमानतो तो रुग्णालयाच्या बाहेर एखाद्या हिरोप्रमाणे आला. त्यानंतर लगेच त्याच्या खासगी कारमध्ये बसून तो त्याच्या राहत्या घरी गेला.
डॉक्टरांनी काय सल्ला दिला? कोणत्या गोष्टींना मुकणार?
सैफ अली खानला सध्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला असला तरी त्याच्या जखमा अद्याप ताज्याच आहेत. या जखमा भरून निघण्यासाठी त्याला पुढचे काही दिवस काळजी घ्यावी लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टरांनी त्याला काही सल्ले दिले आहेत. यात सर्वप्रथम सैफ अली खानला एक महिना आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सोबतच त्याला पुढचे काही दिवस जीममध्ये व्यायाम करता येणार नाही. यासह प्रकृतीत सुधारणा होईपर्यंत त्याला चित्रपटांच्या शूटिंगसाठीही जाता येणार नाही. यासह त्याला कोणतीही जड वस्तू उचलता येणार नाही.
View this post on Instagram
सैफच्या घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे
दरम्यान, सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्यापूर्वी रुग्णालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तसेच त्याच्या राहत्या घरात आता सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले आहेत. तसेच घराच्या बाहेर जाळी लावण्यात आली आहे.
हेही वाचा :
कर्करोगाशी झुंज देणारी अभिनेत्री हिना खानचा ग्लॅम लूक; पाहा फोटो!
Shriya Pilgaonkar : श्रिया पिळगावकरचा मनमोहक लूक; चाहते घायाळ!