आईच्या कुशीत लपलेली ही लाडकी मुलगी आता बनणार नववधू, जाणून घ्या कोण आहे ही अभिनेत्री
Karishma Tanna : गेल्या दोन दिवसांपासून करिश्मा तन्ना हिच्या लग्नातील हळदी आणि मेहंदी समारंभाचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. करिश्मा तिच्या हळद आणि मेहेदी लूकमध्ये सुंदर दिसत होती.
Karishma Tanna : गेल्या वर्षभराता बरेच बॉलिवूड स्टार विवाह बंधनात अडकले आहेत. नुकताच अभिनेत्री कतरिना आणि अभिनेता विकी कौशल यांचा विवाह झाला आहे. आता अजून एक अभिनेत्री विवाह बंधनात अडकणार आहे. फोटोत दिसणारी आईच्या मांडीवर बसलेली ही बाहुली आता आईपासून दूर आपल्या पतीच्या घरी जाण्यासाठी सज्ज झाली आहे. फोटोत दिसणारी ही मुलगी टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आज ही अभिनेत्री तिचा अनेक वर्षापासूनचा बॉयफ्रेंड आणि बिझनेसमनसोबत लग्न करणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या लग्नाचे विधी सुरू आहेत. त्यांच्या लग्न समारंभाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.
ही अभिनेत्री एकता कपूरची खास नागिन देखील आहे. पण लग्नामुळे ही अभिनेत्री नागिन स्पेशल वसंत पंचमीच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार नाही. यासोबतच तिने तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत लव्ह रियालिटी शोही होस्ट केला आहे.
फोटोत दिसणारी ही सुंदरी दुसरी कोणी नसून करिश्मा तन्ना आहे. करिश्मा ही टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक सुपरहिट मालिकांमध्ये दमदार भूमिका केल्या आहेत. करिश्मा आता तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. बॉयफ्रेंड वरुण बंगेरासोबत मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधणार आहे.
View this post on Instagram
गेल्या दोन दिवसांपासून करिश्मा तन्ना हिच्या लग्नातील हळदी आणि मेहंदी समारंभाचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. करिश्मा तिच्या हळद आणि मेहेदी लूकमध्ये सुंदर दिसत होती. यासोबतच तिच्या मेहंदी सेरेमनीच्या एका व्हिडीओनेही बरीच चर्चा केली. या व्हिडिओमध्ये, करिश्माचा वरराजा तिची मेहंदी सुकवण्यात व्यस्त होता, तेही ड्रायरने. तसेच या व्हिडिओमध्ये वरुण देखील करिश्माच्या हातात त्याचे नाव शोधताना दिसत होता. मेहंदीच्या सोहळ्यात करिश्मा तन्ना आणि तिच्या भावी नवऱ्यानेही भरपूर डान्स केला.
महत्वाच्या बातम्या