(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ranbir Kapoor : हूकस्टेप कॉपी करत रणबीर कपूरने केलं आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’चं प्रमोशन!
Gangubai Kathiawadi : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटाच्या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट पाहत होते आणि चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर येताच चाहत्यांना आनंद झाला.
Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) आगामी चित्रपट 'गंगूबाई काठियावाडी'चा (Gangubai Kathiawadi) दुसरा ट्रेलर शुक्रवारी (4 फेब्रुवारी) रिलीज झाला आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटाच्या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट पाहत होते आणि चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर येताच चाहत्यांना आनंद झाला. या ट्रेलरमध्ये आलिया भट्टच्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली. केवळ चाहतेच नाही, तर करण जोहरपासून अनिल कपूरसारख्या अनेक सेलिब्रिटींनीही आलियाच्या कामाचे कौतुक केले आहे.
त्याचवेळी आता आलिया भट्टचा बॉयफ्रेंड रणबीर कपूरनेही 'गंगूबाई काठियावाडी'च्या ट्रेलरवर आपली प्रतिक्रिया दिली असून, त्याने गर्लफ्रेंड आलिया भट्टला पाठिंबा दिला आहे.
रणबीरने केली आलियाची स्टेप
वास्तविक, नुकताच रणबीर कपूर एका सार्वजनिक ठिकाणी स्पॉट झाला होता. यादरम्यान पापाराझींनी रणबीर कपूरला आलिया भट्टच्या 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाच्या ट्रेलरवर त्याची प्रतिक्रिया विचारली. मीडियाने अभिनेत्याला विचारले की, तुम्हाला 'गंगूबाई काठियावाडी'चा ट्रेलर कसा वाटला? यावर रणबीर कपूर काही बोलला नाही, पण त्याने असे काही केले की सर्वांना आनंद झाला.
या प्रश्नाला उत्तर देताना रणबीर कपूरने 'गंगूबाई काठियावाडी'ची हूकस्टेप कॉपी केली. त्याने मागे वळून दोन्ही हात जोडून आलियाची स्टेप कॉपी केली. या खास प्रसंगाचा एक व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये रणबीर कपूर मागे वळून मीडियासमोर दोन्ही हात जोडताना दिसत आहे. या दरम्यान तेथे उपस्थित असलेले सर्व पत्रकार खुश होतात. रणबीर कपूरने या स्टेपवरूनच सांगितले आहे की, त्याला त्याची गर्लफ्रेंड आलिया भट्टच्या 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाचा ट्रेलर आवडला आहे.
अजय देवगणही महत्त्वाच्या भूमिकेत
संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित 'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची कथा 'द माफिया क्वीन ऑफ मुंबई' या पुस्तकावर आधारित आहे. हे पुस्तक लेखक हुसैन झैदी यांनी लिहिले आहे. या चित्रपटात आलिया भट्ट व्यतिरिक्त अजय देवगण देखील दिसणार आहे. अभिनेत्याची भूमिकाही खूप महत्त्वाची असणार आहे, त्याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली आहे.
हेही वाचा :
- Nora Fatehi: नोराचे इन्स्टाग्राम डिलीट? त्या आधी सिंहाला घास भरवतानाचा व्हिडीओ व्हायरल
- Kiran Mane : माझ्यावर केलेले आरोप धादांत खोटे, किरण मानेंनी ठोकला 5 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा!
- Nora Fatehi Instagram : नोरा फतेहीचं अकाऊंट इंस्टाग्रामवरून गायब, काही तासांपूर्वीच शेअर केले होते दुबई व्हेकेशनचे फोटो
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha