(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nora Fatehi Insta Hacked: : नोरा फतेहीचं इंस्टाग्राम अकाऊंट झालं होतं हॅक, सुरू होताच इंस्टा स्टोरीतून दिली माहिती
Nora Fatehi Insta Hacked : नोरा फतेहीचे इंस्टाग्राम अकाऊंट पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे.
Nora Fatehi Insta Hacked : दिलबर गर्ल नोरा फतेहीचे (Nora Fatehi) इंस्टाग्राम अकाऊंट पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे. तिचे इंस्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे तिच्या सर्व पोस्ट आणि फॉलोअर्सची यादी अचानक गायब झाली होती. सुमारे 4-5 तास तिचे खाते निष्क्रिय होते. पण आता खाते सक्रिय झाल्यानंतर नोराने इंस्टा स्टोरीच्या माध्यमातून अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली आहे.
View this post on Instagram
नोराचे इंस्टाग्राम अकाऊंट डिलीट झाले आहे, नोराने आता इंस्टाग्रामला रामराम केला आहे अशा अनेक चर्चा गेल्या 4-5 तासांत होत होत्या. त्यामुळे नोरा काही काळ ट्विटरवरही ट्रेंड करत होती. अकाऊंट सक्रिय झाल्यानंतर नोराने इंस्टा स्टोरी शेअर करत लिहिले आहे,"सकाळपासून काही हॅकर माझे अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न करत होते". नोराचे इंस्टावर 37.6 मिलिअन फॉलोअर्स आहेत.
नोराची शेवटची पोस्ट काय होती?
अकाऊंट डिलीट होण्याच्या काही तास आधी नोराने तिच्या दुबई व्हेकेशनचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. नोराने पांढऱ्या सिंहासोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केलेत. नोरा मांसाचा तुकडा भुकेल्या सिंहांना स्वतःच्या हाताने खाऊ घालताना दिसून आली.
संबंधित बातम्या
Nora Fatehi: नोराचे इन्स्टाग्राम डिलीट? त्या आधी सिंहाला घास भरवतानाचा व्हिडीओ व्हायरल
Nora Fatehi Instagram : नोरा फतेहीचं अकाऊंट इंस्टाग्रामवरून गायब, काही तासांपूर्वीच शेअर केले होते दुबई व्हेकेशनचे फोटो
Madhubala यांच्या 96 वर्षांच्या बहिणीला सुनेने काढलं घराबाहेर, कुणालाही न सांगता पाठवले मुंबईला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha