एक्स्प्लोर
सुपरस्टार ज्यु. एनटीआरच्या वडिलांचा अपघाती मृत्यू
ज्या हायवेवर नंदामुरी हरिकृष्णा यांचा अपघाती मृत्यू झाला, त्याच हायवेवर 2014 मध्ये त्यांच्या मुलाचाही मृत्यू झाला होता.
हैदराबाद: आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांचा मुलगा नंदामुरी हरिकृष्णा यांचा अपघाती मृत्यू झाला. 63 वर्षीय नंदामुरी हरिकृष्णा राज्यसभा सदस्य होतेच शिवाय दक्षिणात्य सिनेमात त्यांनी अनेक भूमिका साकारल्या आहेत. नालगोंडा हायवेवर आज सकाळी कारची दुभाजकाला धडक होऊन हा भीषण अपघात झाला. या अपघातात जबर जखमी झालेल्या हरिकृष्णा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
नंदामुरी हरिकृष्णा हे दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता ज्युनियर एनटीआर यांचे वडिल होते. हरिकृष्णा यांचा दुसरा मुलगा कल्याण राम हा सुद्धा दक्षिणेकडील सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता आहे.
प्रसिद्ध अभिनेता ज्युनिअर एनटीआर
हरिकृष्णा हे टीडीपी पॉलिट ब्युरोचे सदस्य आणि आंध्र पदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांचे नातेवाईकही होते.
फॅनच्या लग्नाला जाताना दुर्घटना
हरिकृष्णा हे कवालीवरुन नेल्लोरला जात होते. एक चाहत्याच्या लग्नाला जात असताना भीषण अपघात झाला. नालगोंडा हायवेवर त्यांची गाडी दुभाजकला धडकली. अपघातावेळी हरिकृष्णा स्वत: गाडी चालवत होते. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र जबर जखमी झालेल्या हरिकृष्णा यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. अपघात झालं ते ठिकाण हैदराबादपासून जवळपास 100 किमी अंतरावर आहे.
याच हायवेवर मुलाचाही मृत्यू
ज्या हायवेवर हरिकृष्णा यांचा अपघाती मृत्यू झाला, त्याच हायवेवर 2014 मध्ये त्यांच्या मुलाचाही मृत्यू झाला होता. दुर्दैवी योगायोग म्हणजे ज्याठिकाणी हरिकृष्ण यांचा अपघात झाला, त्या ठिकाणाच्या काही अंतरावरच त्यांच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला होता.
जिथे मुलाचा मृत्यू, त्याच हायवेवर वडिलांचा अपघात, अभिनेते नंदामुरी हरिकृष्णांचं निधन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
कोल्हापूर
राजकारण
विश्व
Advertisement