Dasvi : अभिषेक बच्चनचा 'दसवीं' जिओ सिनेमा आणि नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित
Abhishek Bachchan : अभिषेक बच्चनचा आगामी 'दसवीं' सिनेमा नेटफ्लिक्स आणि जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे.
Dasvi : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा (Abhishek Bachchan) 'दसवीं' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अभिषेक गंगाराम चौधरीच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षक सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा जिओ सिनेमा आणि नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
'दसवीं' सिनेमात अभिषेक बच्चन तुरुंगात अभ्यास करताना दिसणार आहे. सिनेमाचा टीझर शेअर करत अभिषेकने लिहिले आहे, "दहावीच्या विद्यार्थ्यांना एका विद्यार्थ्याकडून परिक्षेसाठी शुभेच्छा". 'दसवीं'चा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.
View this post on Instagram
टीझरमध्ये अभिषेक बच्चन म्हणतो, जास्त आवाज करू नका. मी दहावीच्या परिक्षेची तयारी करत आहे. तुरुंगात अभ्यास करणं हा माझा शिक्षणाचा हक्क आहे. या सिनेमात यामी गौतम, निम्रत कौर, अभिषेकसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. तुषार जलोटा यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत.
संबंधित बातम्या
Sarsenapati Hambirrao Release Date : ठरलं! प्रविण तरडेंचा ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार
Happy Birthday Aamir Khan : आयुष्यातील सर्वात महत्वाचं गिफ्ट 'या' व्यक्तीनं दिलं; आमिरनं दिली माहिती
The Kashmir Files Box Office Collection Day 3: ‘द काश्मीर फाईल्स’ची रेकॉर्ड ब्रेक कमाई, तिसऱ्याच दिवशी जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha