Jawan: 'अरविंद केजरीवाल जे वर्षानुवर्षे बोलत आहेत, तेच आज शाहरुखने 'जवान' मध्ये सांगितले'; आपच्या ट्वीटनं वेधलं लक्ष
Jawan: आम आदमी पार्टीच्या ट्विटर अकाऊंटवर जवान चित्रपटाच्या डायलॉगबाबत एक ट्वीट शेअर करण्यात आलं आहे. या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Jawan: अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाची क्रेझ जगभरात बघायला मिळत आहे. जवान या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटामधील डायलॉग्सनं देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. आता नुकतेच आम आदमी पार्टीच्या ट्विटर अकाऊंटवर जवान चित्रपटाच्या डायलॉगबाबत एक ट्वीट शेअर करण्यात आलं आहे. या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
आपचे ट्वीट
आम आदमी पार्टीच्या ट्विटर अकाऊंटवरुन अरविंद केजरीवाल यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं, अरविंद केजरीवाल जे वर्षानुवर्षे बोलत आहेत, तेच आज शाहरुखने 'जवान' चित्रपटामध्ये सांगितले आहे. जवानमधील डायलॉग्स- "डर, पैसा, जात-पात, धर्म, सम्प्रदाय के लिए वोट देने की बजाय जो आपसे Vote मांगने आये, आप उससे सवाल पूछें - पूछो उससे कि मेरे लिए अगले 5 साल में क्या करोगे? - अगर परिवार में कोई बीमार हो जाये तो उसके इलाज के लिए क्या करोगे? - मुझे नौकरी दिलाने के लिए क्या करोगे? - देश को आगे बढ़ाने के लिए क्या करोगे?" आता ऐका अरविंद केजरीवाल यांचे हे भाषण-'
आम आदमी पार्टीच्या या ट्वीटनं आता अनेकांचे लक्ष वेधले आहे. काही नेटकऱ्यांनी या ट्वीटवर कमेंट्स देखील केल्या आहेत.
जो @ArvindKejriwal जी सालों से कहते आ रहे है, वो बात आज #Jawan फिल्म में SRK ने भी कह डाली
— AAP (@AamAadmiParty) September 7, 2023
Jawan का Dialogue:
"डर, पैसा, जात-पात, धर्म, सम्प्रदाय के लिए वोट देने की बजाय जो आपसे Vote मांगने आये, आप उससे सवाल पूछें
- पूछो उससे कि मेरे लिए अगले 5 साल में क्या करोगे?
- अगर… pic.twitter.com/ttufzwR1ac
जवान चित्रपटामधील अनेक डायलॉग्सचं प्रेक्षक कौतुक करत आहेत. 'बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर...' या जवान चित्रपटामधील डायलॉगची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे.
जवान चित्रपटामध्ये प्रेक्षकांना अनेक सरप्राइज मिळाले आहेत. या चित्रपटात संजय दत्तचा कॅमिओ देखील आहे. तसेच चित्रपटामधील अॅक्शन सीन्सचं देखील अनेकजण कौतुक करत आहेत. शाहरुखनं या चित्रपटामध्ये डबल रोल केला आहे, असं म्हटलं जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: