Aamir Khan च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी! 'लाल सिंह चड्ढा' यावर्षी प्रदर्शीत होणार नाही
आज आमिर खान प्रोडक्शनने सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपट प्रदर्शीत होणाऱ्या नव्या तारखांची घोषणा केली आहे.
Laal Singh Chadhha : बॉलिवूडचे मिस्टर परफेक्टनिस्ट असणाऱ्या आमिर खानचे चाहते त्याच्या आगामी 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहेत. आज आमिर खान प्रोडक्शनने सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपट प्रदर्शीत होणाऱ्या नव्या तारखांची घोषणा केली आहे. प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असलेला हा सिनेमा पुढल्या वर्षी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रदर्शीत होणार आहे.
पुढल्या वर्षी प्रदर्शीत होणार आमिरचा सिनेमा
आमिर खान प्रोडक्शनने ट्वीट करत म्हटले आहे की, सिनेमागृहे 22 ऑक्टोबरला अनलॉक होणार आहेत. सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. पण वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आम्ही 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा पुढल्या वर्षी व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी प्रदर्शीत करण्याचा निर्णय घेत आहोत.
#AamirKhan #KareenaKapoorKhan @Viacom18Studios #AdvaitChandan #AtulKulkarni #PritamDa #AmitabhBhattacharya #LaalSinghChaddha pic.twitter.com/aN5H6fG4dG
— Aamir Khan Productions (@AKPPL_Official) September 26, 2021
चित्रपटाचे शू़टिंग झाले होते मुंबईतच
'लाल सिंह चड्ढा' हा एक विनोदी चित्रपट आहे. हॉलिवूडच्या 'फॉरेस्ट गंप' चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असणार आहे. हॉलिवूडच्या या चित्रपटात मुख्य भूमिकेत टॉम हैंक्स दिसून आले होते. या चित्रपटात करीना कपूर खान देखील असणार आहे. या चित्रपटाची शूटिंग मागील वर्षात सुरु झाली असून यावर्षात मुंबईत पूर्ण झाली होती. शूटिंग पूर्ण झाल्यानंतर सेटवर चित्रपटातील कलाकारांनी केक कापून आनंद व्यक्त केला होता.
नागा चैतन्य करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
साउथचा स्टार नागा चैतन्य या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. चित्रपटात आमिर खान आणि करीना कपूर व्यतिरिक्त मोना सिंहदेखील पहायला मिळणार आहे. करीना कपूर खानने याच वर्षी फेब्रुवारीमध्ये तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला होता.