एक्स्प्लोर

Milind Gawali: "रागावणं, चिडणं किंवा शिवीगाळ करणं याने मला..."; मिलिंद गवळी यांच्या पोस्टनं वेधलं लक्ष

मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यांनी या फोटोला दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Milind Gawali: अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) हे आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतात. मिलिंद हे त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या भेटीस येतात. तसेच मिलिंद हे सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट शेअर करतात. नुकतेच मिलिंद गवळी यांनी त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यांनी या फोटोला दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

मिलिंद गवळी यांची पोस्ट

मिलिंद गवळी यांनी पोस्टमध्ये लिहिलं, “आनंद”, प्रत्येकाच्या आनंदाच्या व्याख्या खूप वेगवेगळ्या असतात,काही ना खाण्यापिण्यामध्ये खूप आनंद मिळतो. माझा एक मित्र आहे, खास एखाद्या हॉटेलमध्ये एखादी डिश अतिशय चांगली मिळते म्हणून खूप लांबचा प्रवास करून तिथे जाऊन तो पदार्थ खातो, काही जण असे असतात की खाण्यापेक्षा त्यांच्या खाण्यावरच्या चर्चा करायला खूप आवडतं,काहींना तर झोपण्यामध्ये आनंद मिळतो, अगदी अभिमानाने सांगतात की "आज साडेबारा-एक वाजता उठलो आणि मग नाश्ता केला. काहीना मोबाईल गेम्स खेळण्यात, वाचन लिखाण सिनेमा पाहायला, काही ना प्रवास करण्यामध्ये आनंद मिळतो, काही जणांना गाण्यांमध्ये आनंद मिळतो.काहीं ना निसर्गाच्या सानिध्यात आनंद,माझं असं लक्षात आलं आहे की आनंद हा आपल्याच मानण्यामध्ये असतो,माझ्या आयुष्याच्या प्रवासामध्ये मला काही छान आनंदी माणसं भेटली होती, जी काही कारण नसलं तरी आनंदी असायची, सदैव प्रसन्न असायची, दोन पैसे कमी असतील त्यांच्याकडे पण कधीही त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू कमी व्हायचं नाही, त्यांना भेटलं की आपोआपच आपल्याही चेहऱ्यावर एक स्मितहास्य यायचं,माझ्या वडिलांना दुसऱ्यांना मदत करान्यात फार आनंद मिळतो, दुसऱ्याला आपली गरज आहे आणि त्यांना मदत करण्यात आनंद मिळतो आणि ते प्रसन्न होतात. ते पोलीस खात्यात होते त्यावेळेला त्यांचा गैरफायदा घेणारे असंख्य लोक होते, आम्हाला ते जाणवायचं की हा माणूस त्यांचा गैरफायदा घेतो आहे, पण त्याचं त्यांना कधीच काही वाटलं नाही, आपल्याकडे मदत मागायला आलाय आणि आपण त्याला प्रामाणिकपणे मदत करावी एवढेच त्यांना माहीत होतं.त्यामुळे ते सतत प्रसन्न आणि आनंदी राहतात, कारण मनामध्ये काही कपटच नसतं."

पुढे त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, "प्रामाणिकपणे काम करत राहणे यात जो आनंद आहे तो आनंद कशातच नाही असं त्यांना वाटतं, मी कसा जरी असलो तरी माझ्या आई-वडिलांचे काही अतिशय चांगले गुण माझ्यामध्ये थोडीफार उतरलेले आहेत, कदाचित त्यामुळेच इतकी वर्ष मी या क्षेत्रामध्ये मी तरलोय.आनंदी प्रसन्न माणसं सगळ्यांनाच आवडतात असतात, पण रागावणाऱ्या माणसांपासून लोक थांब पळत असतात,रागावणं चिडणं किंवा शिवीगाळ करणं याने मला असं वाटतं त्याने आपल्याच शरीरामध्ये बिघाड होतो, त्यांचं स्वतःचं शरीराचे इंजिन तापल्यामुळे लवकर बंद पडायची शक्यता असते, याउलट आनंदी माणूस खूप निरोगी आणि energetic आयुष्य जगतो.मला फोटो काढायला आणि काढून घ्येण्यात आनंद मिळतो."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

'आई कुठे काय करते' या मालिकेत अनिरुद्ध ही भूमिका मिलिंद गवळी हे साकारतात. या मालिकेतील ईशा ही भूमिका अपूर्वा गोरे  ही साकारते. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Milind Gawali: 'आज माझी आई असती...'; मिलिंद गवळींनी दिला आठवणींना उजाळा, शेअर केली पोस्ट

महत्त्वाच्या बातम्या

Maniesh Pauls Mother Death: टीव्ही होस्ट मनीष पॉलवर दुखा:चा डोंगर, आईचे निधन; अभिनेता शोकसागरात बुडाला
टीव्ही होस्ट मनीष पॉलवर दुखा:चा डोंगर, आईचे निधन; अभिनेता शोकसागरात बुडाला
Sushant Singh Saurav Ganguly: राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच
राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच
Toxic Film yash and kiara: रोमान्स, लिपलॉक अन् भरपावसात.., 'टॉक्सिक'चं 'तबाही' गाणं रिलीज, यश-कियाराची केमिस्ट्री पाहून प्रेक्षकांना फुटला घाम
रोमान्स, लिपलॉक अन् भरपावसात.., 'टॉक्सिक'चं 'तबाही' गाणं रिलीज, यश-कियाराची केमिस्ट्री पाहून प्रेक्षकांना फुटला घाम
Colors Marathi Mee Jinkun Ghein Saara: राजगुरू परिवारावर संकटाचे सावट, शांभवीचा खरा चेहरा उघड करण्यासाठी छवी सज्ज, 'मी जिंकून घेईन सारं' मालिकेत काय घडलं?
राजगुरू परिवारावर संकटाचे सावट, शांभवीचा खरा चेहरा उघड करण्यासाठी छवी सज्ज, 'मी जिंकून घेईन सारं' मालिकेत काय घडलं?

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
Embed widget