Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Dilip Joshi on Marathi Actors: दिलीप जोशींनी मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांचं कौतुक केलं.

Dilip Joshi on Marathi Industry: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Tarak Mehta Ooltah Chashma) या मालिकेला 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. या मालिकेतून जेठालालसह इतर कलाकारांच्याही भूमिका गाजल्या. विशेषत: 'जेठालाल' (Jethalal) हे पात्र घराघरात पोहोचलं. दिलीप जोशी (Dilip Joshi) यांनी आपल्या कारकिर्दीत सिनेमासह मालिकेतही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. पण त्यांना खरी ओळख 'जेठालाल' या पात्रामुळे मिळाली. 'जेठालाल'ची एक विशेष शैली आहे. दिलीप जोशी 'जेठालाल' हे पात्र उत्तमरित्या साकारतात. अलिकडेच दिलीप जोशी यांनी 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी मालिकेतील अनेक किस्से शेअर केले. तसेच मराठी सिनेइंडस्ट्रीतील आवडत्या मराठी कलाकारांबद्दलही सांगितलं.
दिलीप जोशींकडून मराठी कलाकारांचं कौतुक (Dilip Joshi Praises Marathi Actors)
दिलीप जोशी मराठी सिनेविश्वातील कलाकारांचे कौतुक करत म्हणाले की, 'मराठी सिनेसृष्टीत एकापेक्षा एक दिग्गज कलाकार आहेत. प्रशांत दामलेंसह मोठ मोठे कलाकार आहेत. मला मराठी येते. पण मराठी मालिकेत काम करण्यासाठी मराठी भाषा शुद्ध असायला पाहिजे. एवढी माझी शुद्ध मराठी नाही. भाषेचा जो मान आहे, तो राखला पाहिजे. मी बरेच मराठी नाटकंही पाहिली आहेत', असं दिलीप जोशी म्हणाले.
View this post on Instagram
'मराठी सिनेसृष्टीत अद्भूत काम केलं जातं. मी अलिकडेच 'देवभाबळी' पाहिला. दिलीप प्रभावळकर हे माझ्या आवडत्या कलाकारांपैकी एक आहेत. त्यांचं 'हसवा फसवी' हे नाटक साधारण तीन - चार वेळा पाहिलं असेल. मी बऱ्याच वर्षांपूर्वी त्यांच्यासोबत एका सिरिअलमध्येही काम केलं होतं. पण दुर्देवाने ती सिरिअल टेलिकास्ट झालेली नाही. पण मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. दिलीप प्रभावळकर, अमिता खोपकर यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली'.
'मराठी सिनेइंडस्ट्रीत काम करण्याची संधी मिळाली तर, नक्की मी करेन..', असं दिलीप जोशी म्हणाले. या मुलाखतीवरुन दिलीप जोशींचं मराठीवरचं प्रेम दिसून आलं. दिलीप जोशींच्या चाहत्यांनी त्यांचं मराठी प्रेम पाहून कौतुक केलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या:






















