एक्स्प्लोर

Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Ravi Kishan Gets Trolled: रवि किशन पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर, मुलाखतीत नेमकं काय म्हणाले?

Ravi Kishan Gets Trolled in Social Media: भाजप खासदार आणि अभिनेता रवि किशन (Ravi Kishan) सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. त्यांचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियात (Social Media) व्हायरल होत आहे. अलिकडेच रवि किशन आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. त्याने मुलाखतीत आपल्या गरिबीचा आणि संघर्षाच्या दिवसांची आठवण सांगितली. रवि किशन यांनी मुलाखतीत सांगितलं की,  'आर्थिक अडचणींचा (Social Media) आजही त्यांच्या विचारांवर परिणाम होतो', असं त्यांनी सांगितलं. 'यश मिळवल्यानंतरही ते सेव्हन स्टार हॉटेल्समध्ये महागडे जेवण मागवणे टाळतात आणि आपले कपडे लॉन्ड्रीमध्ये देण्यास संकोच करतात'. या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. आधीच चर्चेत असणारे रवि किशन पुन्हा एकदा नवीन वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.

रवि किशन पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर (Ravi Kishan Gets trolled in Social media)

रवि किशन यांच्याकडे प्रचंड संपत्ती आहे. अभिनेता ते राजकारणात पाऊल. त्यांनी कष्टातून सर्व काही मिळवलं आहे.  हे सर्व मिळवण्यासाठी त्यांना कठीण काळाचा सामना करावा लागला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रवि किशन यांनी, गरिबीतील दिवस विसरलेलो नाही, असं सांगितलं. खडतर दिवसांची आठवण काढत रवि किशन म्हणाले की, '7 स्टार हॉटेलमध्ये जाऊन सुद्धा महागडे पदार्थ मागवण्यापेक्षा खिचडी मागवतो', असं त्यांनी सांगितलं. सध्या त्यांचं वक्तव्य सोशल मीडियात चर्चेचा विषय बनला आहे.

मुलाखतीत रवि किशन म्हणाले की, 'मी अशी गरिबी पाहिली आहे की, जेव्हा पण 7 स्टार हॉटेलमध्ये मी जातो, तेव्हा मी चांगले पदार्थ ऑर्डर करत नाही. मग ते प्रोडक्शनचे पैसे असो,  माझ्या स्वत:चे पैसे असो किंवा माझ्या राजकीय पक्षाचा प्रचार असो. आजही मी केवळ साधी खिचडीच मागवतो.  हेच नाही, मी माझे कपडे, लॉन्ड्रीलाही द्यायला कचरतो.  गोरखपूर असो, मुंबई असो किंवा दिल्ली...मी विचार करतो की, घरीच कपडे धुवावेत. पूर्वीतील गरिबी अजूनही माझ्या मनात घर करुन आहे', असं रवि किशन म्हणाले.

रवि किशन यांचा हा मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी मुलाखतीतील बऱ्याच क्लिप्स सोशल मीडियात व्हायरल केल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिले की, 'आम्ही गरिबी 2.O पाहिली आहे', तर आणखी एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये म्हटलं की, 'नेताजी तुम्ही फक्त गरिबी पाहिली आहे, आम्ही ती अनुभवली देखील आहे', असं म्हटलं आहे. सध्या रवि किशन यांची मुलाखत सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

22 वर्षांनंतर संसार मोडला, दारुच्या व्यसनामुळे पतीचे निधन; 'या' प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा भावनिक खुलासा

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Advertisement

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Embed widget