एक्स्प्लोर

Raj Thackeray on Bollywood: मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल

Raj Thackeray on Vivek Oberoi and R. Madhavan: अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंनी भाषणादरम्यान उपस्थित केला सवाल.

Raj Thackeray on Vivek Oberoi and R. Madhavan Shifted to Dubai: महाराष्ट्र नवनिर्माण  विद्यार्थी सेनेच्या 20 व्या वर्धापनदिनानिमित्त आज मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे भव्य  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात त्यांनी जेन झी पिढीवर भाष्य केल. तसेच सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. या भाषणादरम्यान, त्यांनी विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) आणि आर. माधवन (R. Madhavan) यांचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर प्रश्न उपस्थित केला.   'या कलाकारांना जर देशावर प्रेम आहे, पंतप्रधानांवर प्रेम आहे, तसेच देशात विकास होत असल्याचा विश्वास आहे, तर  ते परदेशात का जाऊन राहतायेत?', असा सणसणीत सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरे नेमकं काय काय म्हणाले? (Raj Thackeray on Vivek Oberoi and R. Madhavan)

भाषणादरम्यान राज ठाकरे म्हणाले, 'हजारो उद्योगपती आपला बोजा बिस्तरा बांधून परदेशात निघून गेले आहेत. एवढंच कशाला ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सिनेमा काढला होता. आणि ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारली होती, तो अभिनेता विवेक ऑबेरॉय दुबईमध्ये राहायला गेला आहे. दुबईचा नागरिक आहे तो. विवेक ऑबेरॉय आता भारतात राहत नाही. मोदीजी देशात खूप चांगलं काम करत आहेत, मोदीजी देशाला खूप मोठं करत आहेत. मोदीजी देशात उद्योग आणतायेत... वगैरे वगैरे, अशी मुक्ताफळे ज्यांनी उधळली...कोण तो आर. माधवन, विचारा तो कुठे राहतो. हा आर. माधवन दुबईमध्ये स्थायिक झालेला आहे'.

'या कलाकारांना जर देशाबद्दल प्रेम आहे, देशातील पंतप्रधानांबद्दल प्रेम आहे, ते विकास करत आहेत, असा समजा त्यांना विश्वास आहे, हे परदेशात का जाऊन राहतायेत? ', असा सणसणीत सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. 'हे कलाकार परिवारासकट दुबईला जाऊन का राहतायेत? इथे येणार, सरकारी स्पॉन्सर चित्रपटांमध्ये काम करणार. ते 'धुरंधर' वगैरे... इथे कमाई करुन परत जाणार दुबईला. देशात खूप चांगलं चाललं आहे. मी चालो दुबईला, असं म्हणत जातात. ही माणसं दुबईला जातायेत', असं राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या वक्तव्याची सध्या राजकीय तसेच मनोरंजन क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

संगीतविश्वावर शोककळा! ज्येष्ठ गायिकेचं निधन, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास; 6000 हून अधिक गाण्यांना दिला आवाज

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray on Bollywood: मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल
मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल
Rashmika Mandanna: रश्मिकाच्या चाहत्यांना धक्का; सेटवर झाली गंभीर दुखापत, हिप टेंडन तुटल्याची चर्चा, डॉक्टर म्हणाले, 6 आठवडे तरी....
रश्मिकाच्या चाहत्यांना धक्का; सेटवर झाली गंभीर दुखापत, हिप टेंडन तुटल्याची चर्चा, डॉक्टर म्हणाले, 6 आठवडे तरी....
Ketaki Chitale : जंतर मंतरवरील कॉकरोच पार्टीच्या आंदोलनावर केतकी चितळे अखेर बोललीच, म्हणाली...
जंतर मंतरवरील कॉकरोच पार्टीच्या आंदोलनावर केतकी चितळे अखेर बोललीच, म्हणाली...
NAFA Shortfilm: अमेरिकेतील स्थलांतराच्या वादावर भाष्य करणाऱ्या लघुपटाची चर्चा; 'Undocumented.PDF'चा वर्ल्ड प्रीमिअर चर्चेत
अमेरिकेतील स्थलांतराच्या वादावर भाष्य करणाऱ्या लघुपटाची चर्चा; 'Undocumented.PDF'चा वर्ल्ड प्रीमिअर चर्चेत
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Congress Bhai Jagtap: दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Raj Thackeray and Chandrakant Patil: मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Embed widget