One Act Play : बिगुल वाजलं... दोन वर्षांनंतर रंगणार भव्य एकांकिका महोत्सव
One Act Play : 'सृजन द क्रिएशन' तर्फे एकांकिका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

One Act Play : सध्या नाट्यसृष्टीत आनंदाचे वातावरण आहे. कोरोनाकाळात प्रेक्षकांसह कलाकारांना अत्यंत वाईट दिवस बघावे लागले होते. पण आता नाट्यसृष्टीत वेगवेगळे प्रयोग होत आहे. दोन वर्षांनंतर आता एकांकिका महोत्सव होत आहेत. 'सृजन द क्रिएशन' तर्फे एकांकिका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या रविवारी 15 मे रोजी सकाळी 10.00 ते रात्री 11.00 असा नऊ एकांकिकांचा एक भव्य एकांकिका महोत्सव प्रबोधनकार ठाकरे, लघु नाट्यगृह, बोरिवली येथे सृजनचे कलाकार साजरा करणार आहेत. या महोत्साव अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. त्यामुळे दोन वर्षांनंतर आता पुन्हा एकदा नाट्यरसिक त्याच उत्साहात नाट्यगृहात धुमाकूळ घालणार आहेत.
View this post on Instagram
या महोत्सवात रमेश पवार, आशिष पाथरे, स्मिता पोतनीस, डॉ. स्मिता दातार आणि राजेश देशपांडे यांच्या विविध स्पर्धांमध्ये पारितोषिकप्राप्त एकांकिका सादर होणार आहेत. नाट्यरसिक गेले अनेक दिवस एकांकिका स्पर्धेची प्रतीक्षा करत होते. आता प्रेक्षकांना या एकांकिका महोत्सवाचा आनंद घेता येणार आहे.
संबंधित बातम्या
Sanskrutik Kala Darpan Awards : सांस्कृतिक कलादर्पण स्पर्धेकडे नाट्यसृष्टीचे लक्ष; व्यावसायिक नाटकांची नामांकने जाहीर
Bhirkit : 'भिरकीट' सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित; गिरिश कुलकर्णी आव्हानात्मक भूमिकेत
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
