एक्स्प्लोर

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं निधन

जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं निधन झालं आहे. वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. संतुर वाद्याला संगीत विश्वात वेगळी ओळख निर्माण करुन देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. 

एक-दोन नव्हे 'अवतार'चे तब्बल चार सिक्वेल येणार

नुकताच 'अवतार: द वे ऑफ वॉटर' या अवतार चित्रपटाच्या सीरिजमधील दुसऱ्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट 6 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अवतार या चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता या चित्रपटाचे लवकरच चार भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. अवतार-2 म्हणजेच 'अवतार: द वे ऑफ वॉटर' नंतर 20 डिसेंबर 2024 रोजी अवतार-3 रिलीज होणार आहे. अवतार-3 चं नाव 'द सिड बेअरेर' असं असणार आहे. तसेच अवतार 4 हा चित्रपट देखील 18 डिसेंबर 2026 रोजी रिलीज होणार असून या चित्रपटाचं नाव 'द कुलकून रायडर' असं असणार आहे. तर अवतार-5 चित्रपटाचं नाव the quest for eywa असं असणार आहे. हा चित्रपट 22 डिसेंबर 2028 रोजी प्रदर्शित होणार आहे.

सिंगापूरमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर बंदी!

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'द काश्मीर फाइल्स'ने थिएटरमध्ये प्रचंड धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाची जगभरात जोरदार चर्चा झाली. पण, आता हा बहुचर्चित चित्रपट पुन्हा एकदा वादात सापडला आहे. हा चित्रपट वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. रिलीजपूर्वीच 'द कश्मीर फाइल्स' अनेक वादांमुळे चर्चेत आला होता. असे असूनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. पण, आता विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटावर सिंगापूरमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

रंगभूमीवर नव्या नाटकाची नांदी, ‘छुपे रुस्तम’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हृषिकेश-प्रियदर्शनची जोडी!

 लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशा तीनही प्रांतात मुशाफिरी करत अभिनेते हृषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव यांनी आजवर प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन केले आहे. सध्या मात्र नाटयवर्तुळात हे दोघेही ‘छुपे रूस्तम’असल्याची चर्चा रंगली आहे? या दोघांना छुपे रूस्तम का म्हटंल जातय? नेमकी कोणती भानगड या दोघांनी केली आहे? या सगळ्याचा खुलासा येत्या 15 मेला होणार आहे. हे दोन्ही हरहुन्नरी अभिनेते आगामी ‘छुपे रुस्तम’ या नाटकासाठी एकत्र आले आहेत. ‘प्रवेश’ व ‘दिशा’ निर्मित आणि विजय केंकरे दिग्दर्शित हे दोन अंकी नाटक 15 मेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘झॉलीवूड’मध्ये झळकणार झाडीपट्टीचे 130 कलाकार

बऱ्याच राष्ट्रीय-आंतररष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला, पुरस्कारप्राप्त 'झॉलीवूड' हा चित्रपट 3 जून रोजी प्रदर्शित होत आहे. झाडीपट्टी रंगभूमीवर आधारित या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे झाडीपट्टीवरचे खरेखुरे कलाकार आणि यापूर्वी कधीच अभिनय न केलेले सर्वसामान्य लोक चित्रपटांतील भूमिकांमध्ये दिसतील. विदर्भात लोकप्रिय असलेल्या झाडीपट्टी नाटकांविषयी उर्वरित महाराष्ट्रात विशेष माहिती नाही. मात्र, झाडीपट्टी रंगभूमी हा अतिशय खास कलाप्रकार तर आहेच, पण झाडीपट्टी ही जणू एक इंडस्ट्रीच आहे. त्यामुळे 'झॉलीवूड'मधून पहिल्यांदाच झाडीपट्टी चित्रपटाच्या रुपात जगभरात पोहोचणार आहे. हा चित्रपट बऱ्याच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये दाखवला गेला आहे. राज्य पुरस्कारांमध्येही या चित्रपटानं नामांकनं मिळवली आहेत.

'केजीएफ 2' पाहताना चित्रपटगृहातच तरुणाचा मृत्यू

यशचा 'केजीएफ 2' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. आता प्रशांत नील दिग्दर्शित 'केजीएफ 2' हा सिनेमा पाहताना सिनेमागृहात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशमध्ये ही घटना घडली आहे. सध्या पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास घेत आहेत. 

'लॉक अप'चा विजेता ठरलेला मुनव्वर फारुकीला लागली लॉटरी

विनोदवीर मुनव्वर फारुकी सध्या चर्चेत आहे. नुकताच मुनव्वर कंगनाच्या 'लॉक अप'चा विजेता बनण्यात यशस्वी झाला आहे. मुनव्वर आता 'खतरों के खिलाडी 12' मध्ये दिसणार आहे. तसेच त्याला 'बिग बॉस ओटीटी 2' साठीदेखील विचारणा झाली आहे. 

'भूल भुलैया 2' सिनेमातील गाणं प्रदर्शित; कार्तिक-कियाराचा रोमँटिक अंदाज

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2'  हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या सिनेमातील 'हम नशे में तो नही' हे गाणं रिलीज झालं आहे. 

रणवीर सिंहच्या 'सर्कस'चे पोस्टर रिलीज

रणवीर सिंहचा आगामी 'जयेशभाई जोरदार' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या रणवीर या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशातच रणवीरच्या 'सर्कस' सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. रणवीरने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत 'सर्कस'चे पोस्टर शेअर केले आहे. 

 'विजयी भव' चा ट्रेलर प्रदर्शित; 'या' दिवशी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस

 'विजय भव' हे केवळ दोन शब्द प्रचंड उर्जा आणि विजयी होण्यासाठी शक्ती देणारे आहेत. यशाचा हाच गुरुमंत्र आता रसिकांना मोठया पडद्यावर चित्रपटाच्या रूपात पहायला मिळणार आहे. खेळाची राजकारणाशी सांगड घालून गुंफण्यात आलेली कथा 'विजय भव' या आगामी चित्रपटात आहे. या चित्रपटाचा लक्ष वेधून घेणारा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. टायटलमुळे चर्चेत आलेल्या या चित्रपटात काय पहायला मिळणार याची झलक ट्रेलरमध्ये असल्यानं अत्यंत कमी वेळात 'विजय भव'च्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Yuva Sena Beat ABVP in Senate Election : शिक्का सिनेटचा, आवाज ठाकरेंचा; युवासेनेचे 7 उमेदवार विजयीABP Majha Headlines : 06 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 05 PM : 27 September 2024 : ABP MajhaHasan Mushrif on Mahayuti Seat allocation : महायुतीत जागावाटपाचा वाद नाही : हसन मुश्रीफ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Embed widget