Jitendra Awhad: "नावे घ्यावीत तेवढी कमी, एकेकांची घरे शंभर-दीडशे कोटींची, पण"; फिल्मफेअर पुरस्कार गुजरातला हलवल्याने आव्हाडांकडून 'चिरफाड'!
जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याबाबत (Filmfare Awards 2024) नुकतेच एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांनी बॉलिवूडमधील कलाकारांवर टीका केली आहे.
Jitendra Awhad: यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा (Filmfare Awards 2024) गुजरातमध्ये होणार आहे. हा पुरस्कार सोहळा 28 जानेवारी 2024 रोजी गुजरातमधील गांधीनगर येथे होणार असल्याचं म्हटलं जात आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याबाबत नुकतेच एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांनी बॉलिवूडमधील कलाकारांवर टीका केली आहे. या ट्वीटमध्ये जितेंद्र अव्हाड यांनी अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) नावाचा देखील उल्लेख केला आहे.
जितेंद्र अव्हाड यांचे ट्वीट
जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, "भारतीय चित्रपटसृष्टी आणि मुंबई यांचे नाते जवळ-जवळ 100 वर्ष जुने आहे. याच मुंबईत अनेक कलावंत, गायक, अनेक चित्रपट, अनेक गाणी तयार झाली. भारतातील सर्वाधिक सिनेमागृहे याच शहरात होती. पाकिस्तानातून विस्थापित झालेल्या कुटुंबाने याच चित्रपटसृष्टीतून कोट्यवधी रूपये कमावले. भाजीपावच्या गाडीवर काम करणारा अक्षय कुमार याला या मातीचा स्पर्श होताच तो अब्जाधीश झाला. किती नावे घ्यावीत; घेऊ तेव्हढी कमीच आहेत. या मराठी मातीच्या परिसस्पर्शामुळे चित्रपटसृष्टीची भरभराट होत गेली. निदान या कलाकारांनी तरी या मातीची ओळख ठेवायला हवी होती."
फिल्मफेअर पुरस्काराबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, "फिल्मफेअर अॅवाॅर्ड मुंबईतून हलवला जात आहे. त्याविरोधात एकही कलावंत ब्र उच्चारण्यास तयार नाही. म्हणजेच, मराठी मातीचा उपयोग फक्त या लोकांनी स्वतःचे खिसे भरण्यापुरताच केला. एकेकाची घरे शंभर - दीडशे कोटींची आहेत. त्यांनी हे पैसे मेहनतीने कमावले; पण, या मातीतूनच कमावले, हे देखील महत्वाचे आहे. थोडी तरी या शहराबद्दल प्रेम- आपुलकी असती तर एखादा कलाकार तरी बोलला असता. पण, कोणी बोलेल, असे दिसत नाही."
जितेंद्र आव्हाड म्हणाले, "105 हुतात्म्यांनो, माफ करा आम्हाला!"
जितेंद्र आव्हाड पुढे ट्वीटमध्ये लिहिलं, "105 हुतात्म्यांनो, माफ करा आम्हाला ! तुम्ही अतिशय मेहनतीने मुंबई महाराष्ट्राला दिली. या मुंबईने देशाला पोसले. या मुंबईने आंतरराष्ट्रीय प्रतिमा निर्माण केली; जगात एक स्वतःची ओळख निर्माण केली. त्या मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे काम जर झालं असेल आणि आम्ही मराठी माणूस, मग तो कुठल्याही जाती-धर्माचा का असेना तो जर शांत बसत असेल तर तुम्हा हुतात्म्यांना नक्कीच वाटत असेल की, आम्ही कशाला छातीवर गोळ्या झेलल्या ? माफ करा आम्हाला!"
भारतीय चित्रपटसृष्टी आणि मुंबई यांचे नाते जवळ-जवळ १०० वर्ष जुने आहे. याच मुंबईत अनेक कलावंत, गायक, अनेक चित्रपट, अनेक गाणी तयार झाली. भारतातील सर्वाधिक सिनेमागृहे याच शहरात होती. पाकिस्तानातून विस्थापित झालेल्या कुटुंबाने याच चित्रपटसृष्टीतून कोट्यवधी रूपये कमावले. भाजीपावच्या…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 17, 2024
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Filmfare Awards 2024 : यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार गुजरातमध्ये; 'या' दिवशी होणार अवॉर्ड सेरेमनी