Shatrughan Sinha Hospitalised: लेकीच्या लग्नाच्या पाच दिवसांनीच शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल? समोर आली मोठी अपडेट
Shatrughan Sinha Hospitalised: सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या लग्नानंतर अवघ्या पाचच दिवसांत शत्रुघ्न सिन्हा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Shatrughan Sinha Hospitalised: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) नुकतीच तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत (Zaheer Iqbal) लग्नबंधनात अडकली. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक बॉलीवूडच्या कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षावर देखील होत आहे. पण नुकतच सोशल मीडियावर या दोघांचा एक व्हिडीओ तुफान व्हायल होतोय. यामध्ये सोनाक्षी आणि इक्बाल रुग्णालयात जाताना दिसत आहे. अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांना रुग्णालयात दाखल केले होते, त्यांची भेट घेण्यासाठी हे दोघेही रुग्णालयात गेले होते.
रिपोर्ट्सनुसार, शत्रुघ्न सिन्हा हे रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांची तब्येत पूर्णपणे बरी असल्याची देखील माहिती समोर आली आहे. सोनाक्षीच्या लग्नाची बातमी समोर येताच शत्रुघ्न सिन्हा हे नाखुश असल्याचं म्हटलं जात होतं. पण सोनाक्षीच्या लग्नात त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदच साऱ्या प्रश्नांची उत्तर देऊन गेला. दरम्यान लग्नातील धावपळीमुळे त्यांना थकवा आला आणि नियमित तपासणीसाठी ते रुग्णालयात गेले असल्याची माहिती समोर आली. दरम्यान शत्रुघ्न सिन्हा यांना मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सोनाक्षीचा विवाहसोहळा
शत्रुघ्न सिन्हा यांची लेक सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि झहीर इक्बालचा (Zaheer Iqbal) विवाहसोहळा संपन्न झाला असून त्यांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. मागील अनेक दिवसांपासून सोनाक्षीच्या लग्नाची बरीच चर्चा होती. तसेच घरच्यांना देखील हे लग्न मान्य नसल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण अखेर कुटुंबाच्या आणि जवळच्या मंडळींच्या उपस्थितीत सोनाक्षी आणि झहीरने लग्न केलं. त्यांनी रजिस्टर मॅरेज करत कोणत्या पद्धतीने लग्न करणार या चर्चांना देखील पूर्णविराम दिला.
सोनाक्षी आणि झहीरची लव्हस्टोरी
सोनाक्षी आणि जहीर अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने (Salman Khan) आयोजित केलेल्या पार्टीत सोनाक्षी आणि जहीरची पहिली भेट झाली. त्यांच्यात चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सोनाक्षी आणि जहीरने 'डबल XL' नामक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर मागील वर्षी दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं प्रेम जगजाहीर केलं. दोघांनी आजवर एकमेकांसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केलेले आहेत.