(Source: ECI/ABP News/ABP Majha)
40 Years Of Satte Pe Satta : हेमा मालिनी नाही, तर ‘सत्ते पे सत्ता’साठी ‘या’ अभिनेत्रीला होती पहिली पसंती!
Satte Pe Satta memories : 'सत्ते पे सत्ता'मध्ये हेमा मालिनी यांची वर्णी अमिताभ बच्चन यांच्यामुळे लागली होती. त्यांनीच दिग्दर्शकाला अभिनेत्रीचे नाव सुचवले होते.
Satte Pe Satta : बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. बिग बी त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जातात. 'सत्ते पे सत्ता' (Satte Pe Satta) या चित्रपटाचाही त्यांच्या सुपरहिट चित्रपटांच्या यादीत समावेश आहे. या चित्रपटाच्या रिलीजला 40 वर्षे पूर्ण झाली असून, आजही हा चित्रपट लोकांच्या ‘मस्ट वॉच’ यादीत सामील आहे. राज सिप्पी (Raj Sippi) दिग्दर्शित ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत हेमा मालिनी (Hema Malini), शक्ती कपूर (Shakti Kapoor) आणि सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) मुख्य भूमिकेत दिसले होते. पण, तुम्हाला माहीत आहे का की, या चित्रपटासाठी हेमा मालिनी दिग्दर्शकाची पहिली पसंती नव्हती. दिग्दर्शकाला या चित्रपटात दुसऱ्याच एका अभिनेत्रीला कास्ट करायचे होते.
ते वाद नसते तर..
'सत्ते पे सत्ता'मध्ये हेमा मालिनी यांची वर्णी अमिताभ बच्चन यांच्यामुळे लागली होती. त्यांनीच दिग्दर्शकाला अभिनेत्रीचे नाव सुचवले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राज सिप्पीला या चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत रेखाला (Rekha) कास्ट करायचे होते. पण, त्यावेळी रेखा आणि अमिताभ यांच्यातील नात्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे रेखा या चित्रपटाचा भाग होऊ शकल्या नाहीत. असे झाले नसते, तर कदाचित या चित्रपटात रसिकांना अमिताभ बच्चन आणि रेखा यांची जोडी पाहायला मिळाली असती.
‘बिग बीं’नी सुचवले हेमा मालिनींचे नाव!
रेखा या चित्रपटाचा भाग बनू शकल्या नाहीत. त्यानंतर या भूमिकेसाठी परवीन बाबींचे (Parveen Babi) नाव सुचवण्यात आले होते. पण, तोपर्यंत परवीन बाबी यांनी स्वतःला चित्रपटांपासून पूर्णपणे दूर केले होते आणि या चित्रपटाला त्यांनी नाही म्हटले होते. आता या भूमिकेसाठी कोणतीच अभिनेत्री सापडत नव्हती, तेव्हा अमिताभ बच्चन यांनी हेमा मालिनी यांचे नाव सुचवले. हेमा मालिनी यांनी या चित्रपटासाठी लगेच होकार दिला होता.
हेमा मालिनी ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गर्भवती होत्या. हा चित्रपट त्यांनी गरोदरपणात शूट केला होता. त्या खूप काळजीपूर्वक शूटिंग करायच्या. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोन महिन्यांनी हेमा मालिनी यांनी ईशा देओलला (Esha Deol) जन्म दिला होता.
इतर बातम्या :
- Deepika Padukone Fitness : दीपिकासारखी टोन्ड फिगर हवीये? मग, जाणून घ्या तिचा डाएट आणि वर्कआऊट प्लॅन
- Navya Naveli Nanda : ‘बिग बीं’च्या नातीचा साडी लूक पाहून चाहते झाले घायाळ, ‘मामू’ अभिषेकनेही केले कौतुक!
- Man Udu Udu Zala : आकाशाला गवसणी घालत इंद्रा करणार प्रपोज, मिळणार का दिपूचा होकार?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha