एक्स्प्लोर

Bollywood Flop Film: तगडी स्टारकास्ट, बजेट 140 कोटी; तरीसुद्धा बॉक्स ऑफिसवर जोरात आपटला 'हा' चित्रपट, एका झटक्यात मेकर्सच्या अपेक्षांवर पाणी...

Bollywood Flop Film: दरवर्षीप्रमाणे 2019 मध्येही चित्रपटगृहांमध्ये एक बिग बजेट सिनेमा प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील टॉप स्टार एकत्र दिसले होते.

2019 Biggest Bollywood Flop Film: दरवर्षई अनेक चित्रपट चित्रपटगृहांमध्ये (Bollywood Films) प्रदर्शित होत असतात. त्यापैकी काही हिट ठरतात, तर काही सुपरहिट ठरतात. पण असे अनेक चित्रपट आहेत, जे चांगली कमाई करतात, पण तरीसुद्धा बॉक्स ऑफिसवर (Box Office) फ्लॉप ठरतात. असाच एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झालाय. निर्मात्यांनी चित्रपट हिट करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. मोठी स्टारकास्ट, मोठं बजेट आणि इतर सर्व पर्याय वापरले गेले, परंतु या सर्व गोष्टी चित्रपटाला वाचवू शकल्या नाहीत. रिलीजच्या अवघ्या तीन दिवसांत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप ठरला. तुम्हाला माहितीय का? आम्ही कोणत्या चित्रपटाबबात बोलत आहोत? 

दरवर्षीप्रमाणे 2019 मध्येही चित्रपटगृहांमध्ये एक बिग बजेट सिनेमा प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील टॉप स्टार एकत्र दिसले होते. हा चित्रपट बनवण्यासाठी प्रचंड बजेट आणि भव्य-दिव्य सेट वापरण्यात आले. चित्रपटाचं प्रमोशनही जोरदार झालं. चित्रपटाचं प्रमोशन झाल्यानंतर असा विश्वास होता की, हा चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून देईल. सर्वजण याला सुपरहिट चित्रपट मानत होते. पण रिलीज झाल्यानंतर निकाल वेगळेच निघाले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप फ्लॉप ठरला.

चित्रपटाचं कथानक प्रेक्षकांच्या कोर्टात फ्लॉप... 

5 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे नाव आहे 'कलंक'. ज्यामध्ये संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर, वरुण धवन आणि आलिया भट्ट यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश होता, ज्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. पण एवढी मोठी आणि प्रसिद्ध स्टारकास्ट असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. चित्रपटाचे कथानक आणि कथा प्रेक्षकांना अजिबात प्रभावित करू शकली नाही. हा एक पीरियड ड्रामा होता, पण तो प्रेक्षकांच्या मनात आपील छाप सोडू शकला नाही.

तगडी स्टारकास्ट असूनही चित्रपट जोरात आपटला... 

या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक वर्मन यांनी केलं होतं आणि फॉक्स स्टार स्टुडिओच्या बॅनरखाली करण जोहर आणि साजिद नाडियादवाला यांनी निर्मिती केली होती. इतकंच नाही तर प्रचंड बजेट असलेल्या या चित्रपटासाठी भव्य सेट बांधण्यात आला होता. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे बजेट सुमारे 140 कोटी रुपये होतं, पण बॉक्स ऑफिसवर तो फ्लॉप झाला. या चित्रपटात बॉलिवूडचे आठ मोठे सुपरस्टार असूनही हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकण्यात अपयशी ठरला. चित्रपटाच्या अपयशानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

या चित्रपटात आलिया भट्ट आणि वरुण धवन मुख्य भूमिकेत दिसले होते. या जोडीनं यापूर्वीही दोन मोठे हिट चित्रपट दिले आहेत. अशा परिस्थितीत हा चित्रपटही चांगलाच गाजेल अशी आशा सर्वांना होती. जवळपास 140 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा मल्टीस्टारर चित्रपटाला पहिल्या वीकेंडलाच प्रेक्षकांनी नाकारला होता. मोठे स्टार असूनही या चित्रपटाला फारचं वाईट प्रतिसाद मिळाला. चित्रपटाची कथा खूपच कमकुवत होती, जी लोकांना गुंतवून ठेवण्यात अपयशी ठरली. मात्र, चित्रपटातील एक-दोन गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली, पण चित्रपट फारसा प्रेक्षकांना रुचलाच नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Kanguva Editor Nishad Yusuf Dead: Kanguva च्या एडिटरचा मृत्यू, चित्रपचाच्या रिलीजच्या 15 दिवसांपूर्वी घरात आढळला मृतदेह

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इंस्टावर पोस्ट शेअर करत संपवले जीवन; व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव
इंस्टावर पोस्ट शेअर करत संपवले जीवन; व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव
मुंबईत सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग, कामगार अडकल्याची भीती; अग्निशमनच्या 5-6 गाड्या दाखल
मुंबईत सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग, कामगार अडकल्याची भीती; अग्निशमनच्या 5-6 गाड्या दाखल
ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
Shaina NC Vs Arvind Sawant : 'इम्पोर्टेड माल' खासदार अरविंद सावंतांच्या अंगलट; शायना एनसीच्या तक्रारीवरून मुंबईत गुन्हा दाखल
'इम्पोर्टेड माल' खासदार अरविंद सावंतांच्या अंगलट; शायना एनसीच्या तक्रारीवरून मुंबईत गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 7 PM : 1 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaAbdul Sattar vs Raosaheb Danve : नाव नं घेता सत्तारांचा दानवेंना इशाराRashmi Shukla Maharashtra : पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांच्या विरोधात काँग्रेस आक्रमकPriyanka Chaturvedi : सत्ताधाऱ्यांच्या संपत्तीवर प्रियंका चतुर्वेदींचं बोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंस्टावर पोस्ट शेअर करत संपवले जीवन; व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव
इंस्टावर पोस्ट शेअर करत संपवले जीवन; व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव
मुंबईत सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग, कामगार अडकल्याची भीती; अग्निशमनच्या 5-6 गाड्या दाखल
मुंबईत सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग, कामगार अडकल्याची भीती; अग्निशमनच्या 5-6 गाड्या दाखल
ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
Shaina NC Vs Arvind Sawant : 'इम्पोर्टेड माल' खासदार अरविंद सावंतांच्या अंगलट; शायना एनसीच्या तक्रारीवरून मुंबईत गुन्हा दाखल
'इम्पोर्टेड माल' खासदार अरविंद सावंतांच्या अंगलट; शायना एनसीच्या तक्रारीवरून मुंबईत गुन्हा दाखल
देवघरात आग लागली अन् स्वयंचलित दार लॉक; व्यापारी पती-पत्नी जिवंत जळाले, वाचवण्यासाठी गेलेल्या मोलकरणीचाही मृत्यू
देवघरात आग लागली अन् स्वयंचलित दार लॉक; व्यापारी पती-पत्नी जिवंत जळाले, वाचवण्यासाठी गेलेल्या मोलकरणीचाही मृत्यू
मी मंत्री आहे, आता राज ठाकरेंनी पक्ष बंद करावा; रामदास आठवलेंचा मनसे अध्यक्षांवर पलटवार
मी मंत्री आहे, आता राज ठाकरेंनी पक्ष बंद करावा; रामदास आठवलेंचा मनसे अध्यक्षांवर पलटवार
बीडमधील 6 मतदारसंघात लढती ठरल्या, जरांगेंची जादू चालणार; महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
बीडमधील 6 मतदारसंघात लढती ठरल्या, जरांगेंची जादू चालणार; महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
Mallikarjun Kharge : उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार बोलून गेले, पण काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जागेवर खवळले! म्हणाले, 'आम्ही तिकडं महाराष्ट्रासाठी....'
उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार बोलून गेले, पण काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जागेवर खवळले! म्हणाले, 'आम्ही तिकडं महाराष्ट्रासाठी....'
Embed widget