ना मोठे स्टार्स, ना बिग बजेट, तरीही बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई; 18 वर्षांपूर्वी 'या' चित्रपटानं पटकावलेला राष्ट्रीय पुरस्कार
Low Budget Superhit Movie: बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट येतात, त्यापैकी काहींचं बजेट 300-400 कोटी रुपयांपेक्षा जास्त असतं, तर काहींचं बजेट खूपच कमी असतं. दरम्यान, चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालतोय की, नाही... हे चित्रपटगृहात येणाऱ्या प्रेक्षकांवर अवलंबून असतं.
2006 Low Budget Superhit Movie: दरवर्षी बॉक्स ऑफिसवर (Box Office) अनेक चित्रपट येत असतात. त्यापैकी काही हिट होतात, तर काही जोरदार आपटतात. बऱ्याच काळापासून बॉलिवूडमध्ये (Bollywood) एक ट्रेंड आहे. तो म्हणजे, मोठे सुपरस्टार, उत्तम गाणी असली म्हणजे, चित्रपट हिट. पण आता हे समीकरण बदलत चाललंय... आताच नाही यापूर्वीही असे अनेक चित्रपट आले, ज्यामध्ये मोठी स्टारकास्ट नव्हती, गाणी नव्हती, भव्य दिव्य सेट्स नव्हते. तरीसुद्धा त्यांनी बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला.
आज आम्ही तुम्हाला 18 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये कोणताही मोठा हिरो नव्हता, तरीही हा चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर गाजला. एवढंच नाहीतर बक्कळ गल्लासुद्धा जमवला. एवढंच काय तर या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.
लो बजेट मुव्ही, मोठी स्टारकास्ट नाही... तरीही बॉक्स ऑफिस हादरवलं
बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट येतात, त्यापैकी काहींचं बजेट 300-400 कोटी रुपयांपेक्षा जास्त असतं, तर काहींचं बजेट खूपच कमी असतं. दरम्यान, चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालतोय की, नाही... हे चित्रपटगृहात येणाऱ्या प्रेक्षकांवर अवलंबून असतं. प्रेक्षक चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपट चांगला आहे की, नाही हे ठरवतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये कोणताही मोठा हिरो दिसला नाही आणि चित्रपटाची कथाही इतकी रोचक नव्हती. तरीसुद्धा प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलं.
'खोसला का घोसला' असं या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट दिबाकर बॅनर्जी यांनी दिग्दर्शित केलेला. अनुपम खेर, बोमन इराणी, परवीन डबास, विनय पाठक, रणवीर शौरी आणि तारा शर्मा यांसारखे कलाकार या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटाची कथा अतिशय साधी होती. चित्रपटाची कथा एका कुटुंबाभोवती फिरते, ज्याची जमीन गुंडांनी बळकावलेली असते, त्या गुंडांपासून ते आपली जमीन मुक्त करण्यासाठी विविध मार्गांनी प्रयत्न करतात. हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे, जो लोकांना खूप हसवतो. चित्रपटाच्या या पैलूनं प्रेक्षकांची मनं जिंकली.
18 वर्षांपूर्वी या चित्रपटानं भरघोस कमाई करून सर्वांना चकीत केलेलं
हा चित्रपट 18 वर्षांपूर्वी म्हणजे, 2006 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि रिलीज झाल्यानंतर लगेचच बॉक्स ऑफिसवर हिट झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा एवढा उदंड प्रतिसाद मिळेल, असं या चित्रपटाच्या निर्मात्यांनाही वाटलं नसेल. विशेष म्हणजे, हा चित्रपट नुकताच 18 ऑक्टोबरला शुक्रवारी थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला. या चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळत असल्या तरी 18 वर्षांपूर्वी या चित्रपटानं भरघोस कमाई करून सर्वांना चकीत केलं होतं. या चित्रपटाचं बजेट खूपच कमी होतं.
एवढंच नाही तर 54 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कारही मिळाला. याशिवाय या चित्रपटाचे बजेट खूपच कमी होते. असं असूनही या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. विकिपीडियावर देण्यात आलेल्या माहितीनुसार, अनुपम खेर आणि बोमन इराणी अभिनीत या चित्रपटाचं बजेट 3.75 कोटी रुपये होतं, पण या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 6.67 कोटी रुपयांची कमाई केलेली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :