एक्स्प्लोर

Anuradha Paudwal on Personal Life: 25 दिवसांत चिमुकलीचा मृत्यू, तरुण मुलालाही गमावलं; अनुराधा पौडवाल यांच्या आयुष्यात दु:खाचे वादळ

Bollywood Singer Anuradha paudwal: अनुराधा पौडवाल यांनी एकेकाळी संगीत विश्वाला राम राम करण्याचा निर्णय घेतला होता.

Bollywood Singer Anuradha paudwal on Personal Life: आपल्या सुमधुर आवाजातून प्रेक्षकांच्या मनात घर तयार करणारे आणि लाखो लोकांची मने जिंकणारे अनुराधा पौडवाल यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. गायिका अनुराधा यांची ओळख केवळ त्यांच्या गाण्यासाठी नसून, त्यांचे संगीत क्षेत्रात मोठे योगदान आहे. पण वैयक्तिक आयु्ष्यात त्यांनी अनेक चढ उताराचा सामना केला आहे.  त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यात नेमकं काय घडलं? याचा पहिल्यांदाच आपल्या पॉडकास्टमधून खुलासा केला आहे.  2020 साली त्यांनी आपल्या 35 वर्षीय  मुलाला गमावलं होतं. पण त्यापूर्वी त्यांनी आपल्या एका नवजात मुलीलाही गमावलं असल्याची माहिती त्यांनी मुलाखतीतून दिली. त्यांनी यातून स्वत:ला कसं सावरलं? पाहूयात.

फक्त 25 दिवसांत अनुराधा यांच्या नवजात मुलीचे निधन (Anuradha paudwal on Personal Life)

न्यूज बूकला दिलेल्या मुलाखतीत  अनुराधा पौडवाल यांनी आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला.  अनुराधा पौडवाल यांनी मुलाखतीत सांगितलं की, त्यांची पहिली मुलगी फक्त 25 दिवसांची होती, जेव्हा तिनं या जगाचा निरोप घेतला. हा गायिकेच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का होता, असंही त्यांनी सांगितलं.  या दु:खातून त्या पूर्णपणे खच्चून गेल्या होत्या, असंही त्यांनी सांगितलं. 

अनुराधा पौडवाल यांनी मुलाखतीत सांगितलं की, नवजात मुलीच्या मृत्यूनंतर त्यांची जगण्याची आणि गाण्याची  इच्छा संपली होती. अनुराधा पौडवाल यांनी मुलाखतीत सांगितलं की, 'मी संगीत विश्व सोडून देण्याचा निर्णय घेतला होता.  सगळं काही संपलं होतं, असं वाटत होतं. त्यानंतर मी दक्षिणेश्वर काली मंदिरात गेले होते.  तिथे काली देवीसमोर प्रार्थना केली. त्यानंतर हळूहळू माझ्या आयुष्यात नवीन वळण मिळालं', असं अनुराधा पौडवाल मुलाखतीत म्हणाल्या.

काळ जसं ओलांडत गेला, त्यांनी स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला. पण 2020 साली त्यांच्यावर पुन्हा दु:खाचा डोंगर कोसळला.  त्यांच्या एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाला. किडनी निकामी झाल्यामुळे अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवाल, यांचा वयाच्या 35 व्या वर्षी निधन झाले.  मुलाच्या निधनानंतर अनुराधा पुन्हा एकदा खचल्या होत्या. पण त्यांनी स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मुलाच्या निधनाच्या बातमीमुळे संपूर्ण संगीत क्षेत्राला धक्का बसला. माहितीनुसार, अनुराधा पौडवाल यांचे  प्रसिद्ध संगीतकार अरुण पौडवाल यांच्याशी  विवाह झाला होता. 1991 साली अरुण पौडवाल यांचे निधन झाले होते. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'देऊळ बंद 2' च्या सक्सेसनंतर टीमकडून मोठं पाऊल, थेट शेतकऱ्यांच्या मुलांना मदत; दिग्दर्शक प्रवीण तरडेंवर कौतुकाचा वर्षाव

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramayan Release Date:4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Embed widget