Dancer Actress Madhumati Passes Away: बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री, डान्सर मधुमती काळाच्या पडद्याआड; वयाच्या 87व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Dancer Actress Madhumati Passes Away: बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री मधुमती यांनी वयाच्या 87व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Dancer Actress Madhumati Passes Away: बीआर चोप्रांच्या महाभारतात कर्ण साकारलेल्या पंकज धीर यांचं निधन झालं. लाडक्या अभिनेत्याच्या निधनानं चाहत्यांना मोठा धक्का बसला. अशातच आता चाहत्यांना आणखी एक धक्का बसला आहे. बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रीनंही जगाचा निरोप घेतला आहे. ज्येष्ठ नृत्यांगणा आणि अभिनेत्री मधुमती यांनी वयाच्या 87व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं संपूर्ण बॉलिवूड शोकसागरात बुडालं आहे.
मधुमती या त्यांच्या उत्तम नृत्यासाठी ओळखल्या जायच्या आणि त्यांची तुलना थेट दिग्गज अभिनेत्री हेलनशी केली जात होती. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यापासून, बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. अक्षय कुमार, चंकी पांडे आणि विंदू दारा सिंह यांनी मधुमती यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अक्षय कुमारनं शेअर केली मधुमती यांचा थ्रोबॅक फोटो
My first and forever guru. Everything I know about dance, I learnt at your feet, Madhumati ji. Har ada, har expression mein aapki yaad hamesha saath rahegi. Om Shanti 🙏 pic.twitter.com/Vo288LSMRZ
— Akshay Kumar (@akshaykumar) October 15, 2025
अक्षय कुमारनं सोशल मीडियावर एक स्टोरी पोस्ट केली, ज्यामध्ये तो नृत्यांगना आणि अभिनेत्री मधुमती यांच्यासोबत दिसतोय. अक्षयनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "माझ्या पहिल्या गुरू, ज्यांच्याकडून मी डान्सबद्दल सर्व काही शिकलो. तुमची पावलं पाहून मी डान्स करायला शिकलो; तुमची अदा, प्रत्येक हावभावात तुमची आठवण नेहमीच राहील..."
विंदू दारा सिंह यांनी काढली मधुमतीची आठवण
Rest in peace our teacher and guide #Madhumati ji. A beautiful life led filled with love and blessings from so many of us who learnt dancing from this legend 🙏🏻 pic.twitter.com/eRRZ3W1LOx
— Vindu Dara Singh (@RealVinduSingh) October 15, 2025
विंदू दारा सिंह यांनी मधुमती यांचे फोटो शेअर केले आणि लिहिलंय की, "आमच्या शिक्षिका आणि मार्गदर्शक मधुमतीजी यांच्या आत्म्याला शांती लाभो. आपल्यापैकी अनेकांनी या महान व्यक्तिमत्त्वाकडून डान्स शिकलाय आणि त्यांच्या प्रेमानं आणि आशीर्वादांनी भरलेलं सुंदर जीवन जगलंय..."
चंकी पांडेनंही वाहिली श्रद्धांजली
चंकी पांडेनंही मधुमती यांचा फोटो शेअर करून आपलं दुःख व्यक्त केलंय. अभिनेत्यानं मधुमतीकडून डान्सही शिकलाय.
मराठी चित्रपटांपासून केली कारकीर्दीची सुरुवात
मधुमती यांचा जन्म 1938 मध्ये महाराष्ट्रातील एका गावात झाला. त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये डान्सर म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी स्वतःला मराठीपुरतं मर्यादित न ठेवता भोजपुरी, पंजाबी, मराठी, दक्षिण भारतीय आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं. त्यांची डान्स करण्याची पद्धत पडद्यावर इतकी हिट ठरली की, त्यांची तुलना त्या काळातली प्रसिद्ध अभिनेत्री हेलेनशी केली गेली.
'राजा हरिश्चंद्र' चित्रपटापासून कारकिर्दीची सुरुवात
डान्सर मधुमती यांनी तिच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात 'राजा हरिश्चंद्र' या चित्रपटापासून केली. तिनं तिच्या पतीसोबत अनेक वर्ष अजिंठा कला मंडळात काम केलं, जे भारतीय सैन्यासाठी कार्यक्रम सादर करायचे.
वयाच्या 19व्या वर्षी केलं लग्न
मधुमती यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी वयाच्या 19व्या वर्षी लग्न केलं आणि 1977 मध्ये डान्स करणं सोडलं. दरम्यान, त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी मुंबईत एक डान्स अकॅडमी उघडली आणि तिथे डान्स शिकवायला सुरुवात केली.























