एक्स्प्लोर

Zubeen Garg Death Reason : स्कूबा डायव्हिंगसाठी पाण्यात घेतलेली उडी अखेरची ठरली, 'या अली' फेम गायक जुबिन गर्गचा अपघाती मृत्यू

Assamese Singer Zubeen Garg Died: थ्रिल अनुभवण्यासाठी समुद्रात घेतलेली त्याची उडी शेवटची ठरली. जुबिन गर्गच्या अशा अकाली एग्झिटमुळे त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. 

Assamese Singer Zubeen Garg Died:  गँगस्टर मधल्या 'या अली' गाण्याचा गायक जुबिन गर्ग यांचं निधन झालं असून संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना गायक जुबिन गर्गचा बुडून अपघाती मृत्यू झाला. थ्रिल अनुभवण्यासाठी समुद्रात घेतलेली त्याची उडी शेवटची ठरली. जुबिन गर्गच्या अशा अकाली एग्झिटमुळे त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, सिंगापूर पोलिसांनी गायकाला समुद्रातून रेस्क्यू केलं आणि तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तातडीनं जुबिन गर्गवर सर्वतोपरी उपचार करण्यात आले. पण, त्याचा काहीच परिणाम झाला नाही. वयाच्या 52 व्या वर्षी जुबिन गर्ग यांनी अखेरचा श्वास घेतला. 

'स्कूबा डायव्हिंग' करताना जखमी, त्यातच घेतला अखेरचा श्वास 

मीडिया रिपोर्टनुसार, 'स्कूबा डायव्हिंग' करताना जखमी झाल्यामुळे गायकाचा मृत्यू झाला. जुबिन गर्ग नॉर्थ ईस्ट फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी सिंगापूरला गेला होता. जिथे तो 20 सप्टेंबर रोजी परफॉर्म करणार होता. त्याच्या मृत्यूच्या वृत्तानं त्याचे कुटुंबीय, आसामसह जगभरातल्या त्याच्या फॅन्सवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

1995 मध्ये मुंबईत आला अन् बॉलिवूडचा आवाज बनला 

जुबिन गर्ग 1995 मध्ये मुंबईत आला. असंख्य लोकांप्रमाणेच बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आलेल्या जुबिन गर्गनं आपला पहिला इंडीपॉप सिंगल अल्बम 'चांदनी रात' सुरू केलेला. त्यानंतर त्यानं काही हिंदी अल्बम आणि रीमिक्स गाणी रेकॉर्ड केली. ज्यामध्ये 'चंदा' (1996), 'जलवा' (1998), 'यही कभी' (1998), 'जादू' (1999), 'स्पर्श' (2000) यांसारख्या अल्बम्सचा समावेश होता. त्यानंतर त्यानं 'गद्दार' (1995), 'दिल से' (1998), 'डोली सजा के रखना' (1998), 'फिजा' (2000), 'कांटे' (2002) यांसारख्या फिल्म्समध्ये गाणी गायली. 

जुबिनला खरी ओळख मिळाली 'गँगस्टर' मधल्या 'या अली' गाण्यामुळे

जुबिन गर्गला बॉलिवूडमध्ये सर्वात मोठा ब्रेक मिळाला 'गँगस्टर' चित्रपटातून. या सिनेमासाठी त्यानं 'या अली' हे गाणं गायलं. जुबिनने आसामी, हिंदी, बंगाली, कन्नड, उडिया, तमिळ, तेलुगू, पंजाबी, नेपाळी, मराठी आणि मल्याळम चित्रपटांसाठीही गाणी गायली. त्याचा जन्म आसाममधील जोरहाट इथे झाला. जुबिन गर्ग हा आसाम आणि पश्चिम बंगालमधील एक रॉकस्टार म्हणून नावारुपाला आलेला.

तीन वर्षांपूर्वी, जुबिन बाथरूममध्ये पडलेला...

यापूर्वी, 2022 मध्ये, जुबिन त्याच्या हॉटेलच्या खोलीत बाथरूममध्ये पडला होता, ज्यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. झुबिन गर्ग त्यावेळी आसाममध्ये होता आणि त्याला ताबडतोब दिब्रुगडमधील संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, जिथे त्याला विमानाने हलवण्यात आलं. सीटी स्कॅनमध्ये असं दिसून आलेलं की, त्याला फिट आल्यामुळे तो चक्कर येऊन जागीच कोसळला.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pimpri-Chinchwad Election 2026: अर्ज छाननीमध्ये अपक्ष ठरल्या, चिन्ह वाटपात थेट घड्याळाच्या उमेदवार झाल्या. पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
अर्ज छाननीमध्ये अपक्ष ठरल्या, चिन्ह वाटपात थेट घड्याळाच्या उमेदवार झाल्या. पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण

व्हिडीओ

Parbhani Akola Special Report : समस्या बेसुमार, मतदानावर बहिष्कार;परभणी अकोल्यातील नागरिकांचा निर्णय
Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri-Chinchwad Election 2026: अर्ज छाननीमध्ये अपक्ष ठरल्या, चिन्ह वाटपात थेट घड्याळाच्या उमेदवार झाल्या. पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
अर्ज छाननीमध्ये अपक्ष ठरल्या, चिन्ह वाटपात थेट घड्याळाच्या उमेदवार झाल्या. पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
BMC Election 2026: मुंबईत राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा फायदा होणार नाही कारण...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली भाजपची ती थिअरी
मुंबईत राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा फायदा होणार नाही कारण...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली थिअरी
Jay Dudhane First Reaction After Arrested: मी हनिमूनसाठी जात होतो आणि...; अटकेनंतर जय दुधाणे नेमकं काय म्हणाला?
मी हनिमूनसाठी जात होतो आणि...; अटकेनंतर जय दुधाणे नेमकं काय म्हणाला?
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Embed widget