Ayesha Jhulka Interview: नाना पाटेकर, मनिषा कोइरालाच्या नात्यात 'या' अभिनेत्रीनं टाकलेला मिठाचा खडा? इतक्या वर्षांनी समोर येऊन सांगितलं सत्य
90 चं दशक गाजवलेल्या आयशा झुल्कानं नाना पाटेकर आणि मिथुन चक्रवर्तीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच, तिनं अक्षय कुमारसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवरही मौन सोडलंय.

Bollywood Actress Reveals Truth Behind Manisha Koirala And Nana Patekar Releationship: बॉलिवूड सेलिब्रिटी (Bollywood Celebrity) आणि त्यांचे अफेअर्स (Affairs) हा चाहत्यांच्या आवडीचा विषय. सेलिब्रिटींचे अफेअर्स (Celebrity Affairs), त्यांच्या पार्ट्या आणि त्यामागचे किस्से, यावर गेल्या कित्येक वर्षापासून गॉसिप सुरू आहे आणि आजही हा विषय तितक्याच आवडीनं चघळला जातो. कित्येक अभिनेते आणि अभिनेत्रींचे अफेअर्स चर्चेचा विषय ठरतात. अशीच चर्चा रंगलेली 90 च्या दशकात नाना पाटेकर आणि मनिषा कोइराला यांच्या अफेअरची. पण, अचानक दोघांचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जाऊ लागलं आणि यासाठी 90 चं दशक गाजवणारी अभिनेत्री कारणीभूत असल्याचंही समोर आलं. आज कित्येक वर्ष लोटल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्रीनं समोर येऊन याबाबत खुलासा केला आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे, आयशा झुल्का (Ayesha Jhulka).
अभिनेत्री आयशा झुल्का हिनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बोलताना नाना पाटेकर (Nana Patekar), मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) यांच्यासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. तसेच, तिनं मुलाखतीत बोलताना अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. 90 च्या दशकात आयशा झुल्काचं नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं होतं. असं म्हटलं जातं की, मनीषा कोईराला (Manisha Koirala) आणि नाना पाटेकर यांचं ब्रेकअप (Manisha Koirala And Nana Patekar Breakup) होण्यासाठीही आयशा झुल्काच कारणीभूत होती. पण, खरंच असं होतं का? याबाबत स्वतः आयशानं खुलासा केला आहे. तसेच, नंतरच्या काळात अक्षय कुमारबाबत आकर्षण वाटत होतं? याबाबतही आयशा झुल्कानं खुलासा केला आहे.
आयशा झुल्कानं विक्की लालवानीला दिलेल्या मुलाखतीत अक्षयसोबतच्या तिच्या नात्याबाबत बोलताना पूर्णपणे नकार दिलेला नाही. पण तिनं तिच्या आणि मिथुनच्या तसेच नाना पाटेकरांच्या अफेअरच्या चर्चा पूर्णपणे नाकारल्या. ती म्हणाली की, मिथुन आणि नाना हे इतके ज्येष्ठ अभिनेते आहेत की, त्यांच्याबद्दल असं बोलता येणार नाही.
आयशामुळेच नाना, मनिषाचं ब्रेकअप?
आयशा झुल्काच्या नाना पाटकेरांच्या कथित अफेअरच्या चर्चांनी 90 च्या दशकात जोर धरला होता. आयशासोबतच्या अफेअरमुळेच नाना आणि मनिषाचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जातं. याबाबत बोलताना आयशा म्हणाली की, "जर तुम्ही त्या काळातील टॅब्लॉइड उघडले, तर तुम्हाला माझं ना तेव्हाच्या जवळपास सर्वच अभिनेत्यांसोबत जोडल्याचं पाहायला मिळेल. नाना आणि मी फक्त चांगले मित्र होतो आणि आमच्यात घट्ट मैत्री होती. जेव्हा तुम्ही एकत्र 6-7 चित्रपट करत असता, त्यावेळी तुम्ही दर दोन दिवसांनी सेटवर एकमेकांना भेटता, बोलता, एकत्र वेळ घालवता... त्या वयात, हा सगळा भोळेपणा असतो."
"मला मैत्रिणींपेक्षा जास्त मित्र आहेत"
आयशा झुल्का पुढे बोलताना म्हणाली की, "आजही मला मैत्रिणींपेक्षा जास्त मित्र आहेत, पण याचा अर्थ असा नाही की, त्या प्रेत्येकाशी रोमँटिक स्वरुपात जोडलं जावं. आजच्या काळात लपवण्यासारखं काय आहे? आपण ते वय ओलांडलंय."
अक्षय कुमारवर फिदा होती आयशा? म्हणाली...
आयशा झुल्कानं अक्षय कुमारबाबतही भाष्य केलं. अभिनेत्रीनं ती अक्षयकडे अट्रॅक्ट झाल्याचं मान्य केलं. आयशा झुल्कानं म्हटलं की, "अट्रॅक्शन असू शकतं, पण ही बाब सामान्य आहे. पण हे अधोरेखितही नव्हतं. जर तुम्ही शारीरिक आकर्षणाबद्दल बोलत असाल, तर मला वाटत नाही की, त्याचं वर्णन करण्याचा हा योग्य मार्ग आहे. आमच्यात नेहमीच ती आवड होती, पण मला वाटत नाही की फिजिकल अट्रॅक्शन हे ते व्यक्त करण्याचा एक चांगला मार्ग आहे."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























