"बाई काय हा प्रकार"; बॉलिवूड अभिनेता नग्न अवस्थेत झाडावर चढला, VIDEO सोशल मीडियात तुफान व्हायरल
Vidyut Jammwals Shocking Instagram Video: विद्युत जामवालचा इन्स्टाग्राम व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नेटकऱ्यांनी केलं ट्रोल.

Vidyut Jammwals Shocking Instagram Video: अॅक्शन स्टार विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) त्याच्या फिटनेस आणि शिस्तबद्ध जीवनशैलीसाठी ओळखला जातो. त्यानं अनेक चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं आहे. विद्युत सोशल मीडियावरही सक्रीय असतो. सोशल मीडियावर अभिनेता त्याचे प्रशिक्षण आणि मजबूत शरीरयष्टी दर्शवणारे व्हिडिओ शेअर करतो. दरम्यान, विद्युत सध्या त्याच्या एका व्हिडिओमुळे प्रचंड चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केला आहे. विद्युतने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. धक्कादायक म्हणजे तो या व्हिडिओत नग्न अवस्थेत दिसत आहे. नग्न अवस्थेत तो झाडावर चढत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचे शरीर व्हिडिओमध्ये एका इमोजीने झाकलेले आहे. हा व्हिडिओ काही क्षणात सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे.
विद्युतचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल
व्हिडिओ शेअर करत त्यानं कॅप्शनमध्ये लिहिले की, "दरवर्षी मी एकदा याची 'सहज' याची प्रॅक्टीस करतो. सहज याचा अर्थ स्वत:ला निसर्गाच्या सानिध्यात आणून निसर्गाशी जोडणे". त्यानं असंही स्पष्ट केले की, हा सराव शरीराच्या सेन्सर्सना सक्रीय करण्यासाठी आणि मानसिक एकाग्रता वाढविण्यास मदत करतात. सध्या विद्युतची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. काही चाहते विद्युतच्या फिटनेस आणि विचारसरणीचे कौतुक करत आहेत. तर, काहींनी त्याला प्रचंड ट्रोलही केलं आहे.
विद्युत व्हायरल व्हिडिओमुळे ट्रोल
एका नेटकऱ्यानं 'असं करण्याची गरज काय होती?', अशी कमेंट केली आहे. तर, दुसऱ्या विनोदी कमेंट केली आहे, 'टारझननेही पान घातले असते', असं नेटकऱ्याने कमेंट केलं. तर, काहींनी त्यानं जाणूनबुजून प्रकाशझोतात राहण्यासाठी स्टंट करत असल्याचा आरोप केला आहे.
विद्युत करणार हॉलिवूडमध्ये पदार्पण
View this post on Instagram
कामाच्या बाबतीत, विद्युत जामवाल शेवटी 2025मध्ये प्रदर्शित झालेल्या मद्रासी चित्रपटात दिसला होता. तो लवकरच हॉलिवूड प्रोजेक्ट स्ट्रीट फायटरमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, विद्युत हा सध्या त्याच्या व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
गिरीजा ओकनंतर 'ही' मराठी अभिनेत्री बनली 'नॅशलन क्रश'! लाल टॉपमधील कातिलाना लूक व्हायरल























